esakal | 'माझ्यावरील कारवाईसाठी मागणी करणारे शिवसेना-भाजपाचे नेते आता कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

imtiyaj jaleel on abdul sattar

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीनंतर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी मास्क न घालताच निर्वाचित उमेदवारांसोबत फोटोसेशन केलं

'माझ्यावरील कारवाईसाठी मागणी करणारे शिवसेना-भाजपाचे नेते आता कुठे?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: 'भाजप आणि शिवसेना नेत्यांनी माझ्याविरुध्द कारवाई करण्यासाठी जेवढी मागणी लावून धरली तेवढी मागणी आता करणार का? नियम असेल तर सगळ्यासांठी समान असला पाहिजे. प्रशासनाने जे नियम माझ्यावर लादले ते दुसऱ्यांवर लावणार का हे मला पाहायचे आहे, अशी प्रतिक्रिया खा. इम्तियाज जलील यांनी राज्यमंत्री अब्दूल सत्तारांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंवर दिली.

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीनंतर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी मास्क न घालताच निर्वाचित उमेदवारांसोबत फोटोसेशन केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील, अर्जून गाढे, अब्दूल सत्तार आणि इतर संचालक दिसत आहेत. त्यामध्ये नितीन पाटील, राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी मास्क घातला नाही. तसेच कोरोनाचे इतर नियमांचही उल्लंघन केलेलं दिसत आहे.

Aurangabad DCC Bank: जिल्हा बँकेचे स्टेरिंग सत्तारांच्या हातात; मात्र सेनेत फूट

पुढे बोलताना खा. जलील म्हणाले की, जर कायदा असेल तर सर्वांसाठी समान असला पाहिजे. या प्रकारावर शिवसेना कारवाई करणार नाही का? माझ्यावर कारवाई करण्यासाठी बऱ्याच शिवसेना नेत्यांनी मागणी केली होती. आता ते नेते कुठे आहेत? त्यावेळेस मी मास्क घातला नाही याची कबूली देऊन माझ्यावर जी कारवाई होईल त्यासाठी मी तयार असल्याचे सांगितले होते. पण राजकारणासाठी शिवसेनेचे आणि भाजपचे काही नेते असे दाखवत होते की, मी काही कोणता देशद्रोहाचा गुन्हा केला आहे.'