esakal | राष्ट्रवादी काँग्रेसने क्रांती चौकात चूल मांडून लाटल्या पोळ्या; गॅस दरवाढीविरुध्द आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

ncp

तेल कंपन्यांनी ‘एलपीजी’ सिलेंडरच्या किमती जाहीर केल्या असून हे दर प्रति सिलेंडर २५ रुपयांनी वाढविले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसने क्रांती चौकात चूल मांडून लाटल्या पोळ्या; गॅस दरवाढीविरुध्द आंदोलन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: देशात मागील काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसले. वाढत्या महागाईचा राज्यात विविध पक्षांकडून ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. आज औरंगाबादमध्ये गॅस दरवाढीविरुध्द होत राष्ट्रवादी काँग्रेसने चुल मांडून शेणाच्या गोवऱ्यावर क्रांती चौकात स्वयंपाक करीत आंदोलन केले.

दिवसेंदिवस गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य महिला त्रस्त झाल्या आहेत. केंद्र सरकारविरुद्ध असंतोष आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक आंदोलन करण्यात आले. यापूर्वीही चुल पेटवा आंदोलन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे करण्यात आले. परंतू त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पुन्हा हे आंदोलन राज्यभर करण्यात आले आहे. सामान्य महागाईत होरपळत असताना घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली.

'आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत एकही नोकर भरती होऊ देणार नाही', मराठा ठोक...

तेल कंपन्यांनी ‘एलपीजी’ सिलेंडरच्या किमती जाहीर केल्या असून हे दर प्रति सिलेंडर २५ रुपयांनी वाढविले आहेत. या आधी व्यावसायिक सिलेंडरचे दर १९० रुपयांनी वाढविले. ही वाढ सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने सरकारविरोधी घोषणा देत असंतोष व्यक्त केला. 

(edited by- pramod sarawale)