आधार लिंक नाही तर कर्जमुक्तीचा लाभही नाही; औरंगाबादमधील ६ हजार ९९३ लाभार्थींचे आधार लिंक नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 February 2021

राज्य सरकारतर्फे आर्थिक संकटात सापडलेल्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजना राबविण्यात आली होती; जिल्ह्यात ६,९९३ लाभार्थीचे आधार लिंक नाही 

औरंगाबाद: राज्य सरकारतर्फे आर्थिक संकटात सापडलेल्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजना राबविण्यात आली होती. मात्र बँकेच्या खात्याला आधार लिंक नसलेल्यांना लाभ मिळणार नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला असला तरीही अजून ६ हजार ९९३ सभासदांचे बँक खात्याला आधार प्रमाणिकरण (लिंक) केले नसल्याने या योजनेचा लाभ मिळाला नाही.

या सभसदांना बँक आणि सहकार विभागातर्फे वारंवार सांगूनही कोणीच आधार लिंक केलेले नाही. म्हणूनच जो पर्यंत आधार लिंक नाही, तर कर्जमुक्तीचा लाभही मिळणार नाही. यामुळे तात्काळ बँक खात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच त्यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाची घोषणा केली होती.

औरंगाबादमध्ये बनावट निवडणूक ओळखपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दोन ते तीन टप्प्यात लाभार्थ्यांची यादी जाहीर करुन थेट त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली होती. यात केवळ आधार प्रमाणिकरण न केल्यामुळे जिल्ह्यातील ६ हजार ९९३ लाभार्थीना योजनेची लाभ मिळाला नाही. आधार प्रमाणिकरण न करणारे सिल्लोड तालुक्यात १ हजार ९१५ सभासद आहेत.तर सर्वांत कमी सभासद खुलताबाद तालुक्यात १७३ सभासद आहेत. या लाभार्थ्यांनी जवळच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावेत असे आवाहन बँक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालायातर्फे करण्यात येत आहे. 

तालुके आधार लिंक बाकी असलेल्या सभासदांची संख्या 
औरंगाबाद ५७६
गंगापूर ४९३ 
कन्नड ९५९ 
खुलताबाद १७३ 
पैठण ४४९ 
फुलंब्री ७७५ 
सिल्लोड १९१५
सोयगाव ७८३ 
वैजापूर ८७०
एकूण ६९९३ 

 

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad breaking news in marathi No Aadhaar link no debt relief Aadhar link