खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण; सोशल मीडियावरून दिली माहिती

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 23 February 2021

महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे

औरंगाबाद: महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातून राजकीय नेतेही सुटले नाहीत. छगन भुजबळ, राजेश टोपे अशा अनेक मुख्य नेत्यांसह आमदार, खासदारांंना कोरोनाची बाधा झाली आहे. 

औरंगाबादमध्येही मागील चार- पाच दिवसांपासून प्रतिदिन कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. या दरम्यानच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. याची माहिती खासदार जलील यांनी ट्विट करून दिली आहे.

पहिली ग्रामपंचायत बैठक ठरली शेवटची...! अपघातात ग्रामपंचायत महिला सदस्या जागीच...

'सर्वांना माझा नमस्कार, माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे. तीन दिवसांपूर्वी मला कोरोनाची काही लक्षणे दिसली होती. त्यानंतर मी स्वतःला वेगळं केलं होतं. सध्या कोरोनावर उपचार घेत आहे. तुम्ही सर्वजण घरी सुरक्षित रहा'.

पगारासाठी विनाअनुदानित शिक्षकांचा आझाद मैदानात पंचवीस दिवसांपासून धरणे आंदोलन

मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत. नागरिकांना आवाहनही केलं आहे की, कामाशिवाय बाहेर पडू नका, विनाकारण गर्दी करु नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad breaking news MP Imtiaz Jaleel infected with corona Information given on social media