esakal | 'मंत्री संजय राठोडांना अटक झालीच पाहिजे', औरंगाबादमध्ये भाजप महिला मोर्चा आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

bjp Aurangabad

आंदोलनकर्त्यांना क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिस आणि महिला पदाधिकाऱ्यांमध्ये काही वेळ झटापट झाली

'मंत्री संजय राठोडांना अटक झालीच पाहिजे', औरंगाबादमध्ये भाजप महिला मोर्चा आक्रमक

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद:  मागील काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं नाव येत आहे. मंत्री राठोड यांना अटक करून सखोल चौकशी करावी या मागणीसाठी आज भाजप महिला मोर्चातर्फे अमरप्रीत चौकात आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांना क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिस आणि महिला पदाधिकाऱ्यांमध्ये काही वेळ झटापट झाली. 'राजीनामा द्या, राजीनामा द्या' संजय राठोड राजीनामा द्या, तिघाडी सरकारचे करायचे काय ,भाजप सरकार जिंदाबाद, तिघाडी सरकार हाय हाय' अशा विविध घोषणा महिला पदाधिकार्‍यांनी दिल्या. पोलिसांतर्फे या आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती.

'औरंगाबाद महापालिकेने आम्हाला विश्वासात घेतलं नाही' पालिकेत समावेश...

पोलिसांतर्फे आंदोलनाच्या सुरुवातीला आंदोलन करू नये अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र आंदोलन करण्यावर पदाधिकारी कायम असल्यामुळे घोषणाबाजी सुरू होताच पोलिसांनी महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता काळे, मनिषा भन्साळी, लता दलाल यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांना  ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान काही महिलांनी रस्त्यावर येत वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.

भरधाव हायवाने सायकलस्वार आणि मोटारसायकलस्वाराला चिरडले

आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत. ही प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करत आहे. संजय राठोडांवर कारवाई व्हावी, निष्पक्षपणे तपास व्हावा अशी आमची मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळायला पाहिजे. या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घेत त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज महिला मोर्चा तर्फे रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात आले- संजय केणेकर, शहराध्यक्ष भाजप