esakal | औरंगाबादकर हळहळले! अवघ्या सातवीतील मुलीने संपवले आयुष्य

बोलून बातमी शोधा

crime news }

आई-वडील कामावर गेले असताना दिपालीने गळफास घेतला आहे. दिपाली सध्या सातवीत शिकत होती

औरंगाबादकर हळहळले! अवघ्या सातवीतील मुलीने संपवले आयुष्य
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: आनंदनगर, पुंडलिकनगर परिसरातील एका १४ वर्षीय मुलीने गळफास घेतल्याची घटना सोमवारी (ता.१) रोजी रात्री नऊवाजेदरम्यान समोर आली. तिला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून रात्री अकरा वाजेदरम्यान मृत घोषित केले. संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे (१४, आनंदनगर) असे त्या मृत मुलीचे नाव आहे. 

पोलिसांनी मृत दिपाली हिच्या नातेवाईकांचा जबाब घेतला असून नातेवाईकांकडून कोणाविरोधात तक्रार आली नसल्याचे पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक मीरा चव्हाण करत आहेत.

पुजा चव्हाणचे वडील उतरले शांता राठोडच्या विरोधात; पोलिसांकडे तक्रार

आई-वडील कामावर गेले असताना दिपालीने गळफास घेतला आहे. दिपाली सध्या सातवीत शिकत होती. एवढ्या लहान वयात आत्महत्या केल्याने औरंगाबादकर हादरले आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.