esakal | बस वळविण्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराची एसटी चालकाला मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

दुपारी एक वाजेच्या दरम्यान बस (क्रमांक एम.एच. ४०, एन ९७७५) ही पैठण येथून गोपेवाडी या गावी जात होती

बस वळविण्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराची एसटी चालकाला मारहाण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पैठण (औरंगाबाद): राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला दुचाकीस्वाराने बस वळविण्याच्या कारणावरून मारहाण केली. ही घटना पैठण शहराजवळील शहागड फाटा येथे नुकतीच घडली. या प्रकरणी संशयित दोन जणांसह दोन अनोळखी व्यक्ती विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

दुपारी एक वाजेच्या दरम्यान बस (क्रमांक एम.एच. ४०, एन ९७७५) ही पैठण येथून गोपेवाडी या गावी जात होती. शहागड फाटा येथे बस वळविताना दुचाकीस्वाराने बस थांबवून बस चालकाला तुला गाडी वळविण्यासाठी एवढी जागा लागते का? असे म्हणत बसच्या खाली ओढले. मारहाण केली.

खळबळजनक : पंजाबचा दहशतवादी नांदेडातून अटक; पंजाब व नांदेड पोलिसांची कारवाई,...

यावेळी इतरही दोन जणांनी तेथे येऊन बस चालकाला आणखी चोप दिला. दरम्यान, पोलिसांची गाडी येताच मारहाण करणाऱ्यांनी पळ काढला. या प्रकरणी बसचालक मिथून गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सय्यद मुजम्मील सय्यद, सय्यद मोईज सय्यद महेमुद (रा. साळीवाडा, पैठण) व अन्य अनोळखी दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

(edited by- pramod sarawale)