esakal | शाळा सुरु तरी विद्यार्थी घरीच! शिक्षकांच्या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना का?
sakal

बोलून बातमी शोधा

teacher

२९ जानेवारीपासून राज्यातील सर्व शिक्षक संघटना, महामंडळे एकत्र येवून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे.

शाळा सुरु तरी विद्यार्थी घरीच! शिक्षकांच्या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना का?

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: राज्यातील सर्व घोषित, अघोषित अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान मिळावे यासाठी राज्यातील विविध शिक्षक, शिक्षकेतर महामंडळ लढा देत आहे. त्या अनुषंगाने २९ जानेवारीपासून राज्यातील सर्व शिक्षक संघटना, महामंडळे एकत्र येवून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे.

त्यासाठी सर्व शिक्षक मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. अनुदानासाठी शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. त्यासाठी औरंगाबाद विभागातून सुमारे सात हजार शिक्षक मुंबईला रवाना झाले आहेत. अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्व शाळा सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

औरंगाबादमध्ये मनसेने सहाय्यक आयुक्तांच्या टेबलावर टाकल्या गुटख्याच्या पुड्या

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नुकतेच शासनाने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचे महत्वाचे वर्ष आहे. परीक्षा तोंडावर आल्या असताना कोरोनामुळे अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. असे असताना अनुदानासाठी शाळा बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक नाराजी व्यक्त करत आहे.

कोरोनानंतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. शाळा बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या शाळा आंदोलनामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत, त्यांचा आढावा घेवून कारवाई करण्यात येईल. 
-डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग 


आंदोलन कशासाठी? 
राज्यातील २७६ प्राथमिक शाळा, एक हजार ३१ तुकड्यांवरील २ हजार ८५१ शिक्षक, १२८ माध्यमिक शाळा व ७९८ तुकड्यावरील २ हजार १६० शिक्षक तर एक हजार ७६१ उच्च माध्यमिक शाळा व ५९८ तुकड्यावरील ९ हजार ८८४ शिक्षकांना २० टक्के अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तसेच २ हजार ४१७ शाळा, ७ हजार ५६१ तुकड्यावरील २८ हजार २१७ शिक्षक ४० टक्क्यांसाठी घोषित करण्यात आले आहे.

धक्कादायक घटना! अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

१४ ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रतिक्षेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना १ नोव्हेंबरपासून २० टक्के अनुदान तर यापूर्वी २० टक्के अनुदान घेणाऱ्यांना ४० टक्के अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. याची १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी अपेक्षित असतांना शासनाने अद्यापही कुठलाच निर्णय घेतलेला नाही. यामुळे राज्यातील ४२ हजार शिक्षकाचा भ्रमनिरास झाला आहे. 

आंदोलनासाठी तीन दिवस शाळा बंद ठेवणार असल्याचे शासनाला निवेदनाद्वारे कळवले होते. मात्र, संस्था महामंडळाने स्वयंस्फूर्तीने शाळा बंद ठेवल्या आहेत. मात्र, शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला शासनच जबाबदार आहे. 
-रवींद्र तम्मेवार, समन्वयक, शिक्षक समन्वयक संघ 

(edited by- pramod sarawale)