esakal | मंत्री संजय राठोडांचा विषय निघताच शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याने जोडले हात आणि म्हणाले...

बोलून बातमी शोधा

subhash desai on sanjay rathod}

कोरोनाचे नियम न पाळल्यास लॉकडाऊन अटळ असल्याची शक्यताही सुभाष देसाईंनी व्यक्त केली आहे

aurangabad
मंत्री संजय राठोडांचा विषय निघताच शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याने जोडले हात आणि म्हणाले...
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दररोज नव्या ऑडिओ क्लीप बाहेर येत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यात शुक्रवारी (ता. २६) संजय राठोड यांचा विषय पत्रकारांनी काढताच औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या विषयावर बोलण्यास नकार देत थेट हात जोडत काढता पाय घेतला.

टिकटॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. विरोधीपक्षाने मंत्री संजय राठोड यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत सरकारला कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांची बाजू ऐकूण घेतल्यानंतरही निर्णय घेतलेला नाही.

कोरोनाच्या अनुषंगाने शहरात कडक निर्बंध; जाणून घ्या नियमावली

त्यामुळे शुक्रवारी औरंगाबाद दौऱ्यावर आलेले पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पत्रकारांनी प्रश्‍न केला. त्यावर त्यांनी हात जोडत राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर बोलायला टाळले. दरम्यान राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढतोय. त्यामुळे नियम पाळले नाही तर पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, असे सुतोवाच सुभाष देसाई यांनी केले. 

मुख्यमंत्री पर्यावरण प्रेमी- 
श्री. देसाई यांनी सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या जागेची केली पाहणी केली. याविषयी ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक विकसित करताना उद्यानातील एकही झाड तोडले जाणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यावरणप्रेमी असून, त्यांनीच तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे याठिकाणी देशी वाणाची झाडे लावली जातील. तसे शपथपत्र न्यायालयात महापालिका प्रशासनातर्फे सादर केले जाईल व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी महापालिका प्रशासन करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सध्या याठिकाणी असलेल्या झाडांची मोजणी करून त्यावर क्रमांक देखील टाकले जातील, असे देसाई यांनी सांगितले. 

Success Story: महिलेने स्वकर्तृत्वाने फुलवलेल्या द्राक्ष बागेचे यशस्वी तिसरे...

न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम- 
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीबाबत मी निवडणूक आयोगाकडून माहिती घेतली आहे. निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानंतर आयोग निवडणुकीसंदर्भात निर्णय घेईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नियमानुसार होईल. कालच कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. कामकाजाला मान्यता मिळाली व पुढचा कार्यक्रम आखला गेला, असे देसाई यांनी सांगितले.