esakal | मामाचा नाद खूळा ! भाचा सैनिक झाला म्हणून दिलं 'गाव जेवण'
sakal

बोलून बातमी शोधा

gangapur news

शैलेश हा अवघ्या 20 व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाला होता. एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण घेऊन तो नुकताच गावाकडे परतला

मामाचा नाद खूळा ! भाचा सैनिक झाला म्हणून दिलं 'गाव जेवण'

sakal_logo
By
जमिल पठाण

कायगाव (औरंगाबाद): भारतीय सैन्यदलात भरती होऊन मराठा लाईट इनफन्टरी बेळगाव कर्नाटकमध्ये एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गावी आलेल्या शैलेश नंदकुमार साध्ये यांचा अमळनेर (ता.गंगापूर) येथे मामा लोकांनी पुढाकार मोठा सत्कार केला. शुक्रवारी (ता.5) रात्री आठच्या दरम्यान भव्य मिरवणूक रॅलीही काढली.

शैलेश हा अवघ्या 20 व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाला होता. एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण घेऊन तो नुकताच गावाकडे परतला. त्याचं गावी जंगी स्वागत करण्यात आलं. शुक्रवारी रात्री आठला अमळनेर (ता.गंगापूर)येथे मामा राजेंद्र मिसाळ आणि विजय मिसाळ यांनी भाचा सैनिक झाला म्हणून त्याचा मोठा सत्कार करून स्वागत केलं. तसेच गाव जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

पिशोरमध्ये लूटमारीच्या उद्देशाने केलेल्या मारहाणीत महिलेचा खून

सैनिक शैलेश, आई रुख्मिणी, वडील माजी सैनिक नंदकुमार साध्ये यांचा मामा मिसाळ पाटील परिवार यांनी व गावकरी मंडळींनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देत नागरी सत्कार केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शकील शेख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगापूर नगर पालिकेचे नगरसेवक प्रदीप भैय्या पाटील, पंचायत समिती सदस्य सुमित मुंदडा, कायगाव येथील डोणगावकर विद्यालयाचे मुख्याध्यापक आयुब शेख, शिवव्याख्याते सरदार दीपक वाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी शिवव्याख्याते दीपक वाबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की, एका शेतकरी कुटुंबातील शैलेशने  जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या परिश्रमावर खडतर प्रशिक्षण पूर्ण करून  सैन्यात भरती झाला ही कौतुकास्पद बाब आहे. देशसेवेचे व्रत घेऊन जम्मूमध्ये नवशेरा येथे कर्तव्य बजावत आहे. शैलेश साध्ये यांची देशसेवेची इच्छा साध्य होऊन त्यांना उदंड आयुष्य यश, कीर्ती लाभो अशा मनोमन शुभेच्छा व सदिच्छा देत पोलिस उपनिरीक्षक शकील शेख यांनी सत्कार कौतुक केले.

संशयितांना अटक करण्यावरून पोलिस-नागरिकांत शाब्दिक वाद

यावेळी माजी नगरसेवक सुरेश पाटील, माजी सरपंच नामदेव मिसाळ, मनोहर पाटील, सैनिक अनिल लिपटे, विविध सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड, संजय साध्ये, ज्ञानेश्वर साध्ये, हरिभाऊ साध्ये, आजोबा दशरथ साध्ये, आजी भागीरथी साध्ये, प्रमोद साध्ये, ज्ञानदेव पठाडे, विजय मिसाळ, राजू मिसाळ, बबनराव मिसाळ, निवृत्त मंडळ कृषी अधिकारी जनार्धन रोकडे, राजेंद्र रोकडे, पोलिस कान्स्टेबल रिझवान शेख, शिक्षक राजेंद्र तारू, अमोल साळवे, अतुल रासकर, विष्णू मिसाळ, रेखा शिंदे, मुक्ताबाई रोकडे, लवकुश करजूले, कचरू मिसाळ, प्रशांत मिसाळ, दत्तात्रय उचित, ज्ञानेश्वर मिसाळ, द्वारकाबाई मिसाळ, गयाबाई मिसाळ, इंदूबाई मिसाळ, आशा बाई मिसाळ, मीराबाई मिसाळ, गजानन मिसाळ यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

(edited by- pramod sarawale)

go to top