
औरंगाबाद: कोरोना संसर्गामुळे महापालिकेवर आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. ३१) आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवसी महापालिकेचा २०२१-२२ या वर्षाचा १२७५ कोटी २४ लाख ११ हजार रुपये खर्च तर १२७४ कोटी ३९ लाख रुपये उत्पन्न असा ८४ लाख ३४ हजार रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेच्या निधीतून शहरात शंभर कोटींचे रस्ते करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
महापालिकेत गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय कारभार सुरू आहे. दरवर्षी प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात स्थायी समिती, सर्वसाधारणमार्फत शेकडो कोटीच्या कामांची भर टाकली जात होती. पण गतवर्षापासून प्रशासनातर्फे वास्तववादी अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यंदाही प्रशासक श्री. पांडेय यांनी वास्तववादी अर्थसंकल्प सादर केल्याचा दावा केला. ते म्हणाले, महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्वच्छ भारत मिशनसाठी प्रथमच तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम २४ कोटींची आहे.
तसेच शहरात शंभर कोटींचे डांबरी रस्ते तयार केले जाणार आहेत. यावेळी मालमत्ता कर वसुलीसाठी नवीन पध्दत अमलात आणली जाणार आहे. चालू वर्षाच्या मालमत्ता कराच्या डिमांड नोट आणि सोबत थकबाकीच्या डिमांड नोट दिल्या जाणार आहेत. वसुली देखील स्वतंत्रपणे केली जाणार आहे. एकूण थकबाकी पैकी ३० टक्के पहिल्या वर्षी त्यानंतर ३० व ४० टक्के अशी वसुली केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पातील ठळक बाबी
असे येतील पैसे
अपेक्षित खर्च -
जुन्या योजना नव्याने सादर-
अर्थसंकल्पातील अनेक योजना नव्याने सादर करण्यात आल्या आहेत. त्यात शहराच्या सीमेवर प्रवेशव्दार उभारणे, स्मार्ट सिटीतील एमएसआयची कामे, नेहरू भवन नाट्यगृहाचा विकास, गरवारे क्रिडा संकुलात जलतरण तलाव विकसित करणे यासह इतर कामांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.