औरंगाबादचे एसआरपीएफ कॅम्प हादरले : 72 जवान पॉझिटिव्ह, एकूण 468 रुग्ण

मनोज साखरे
Friday, 8 May 2020

हिंगोलीनंतर औरंगाबादेतील सातारा परिसरातील एसआरपीएफ कॅम्पमध्ये मोठा धक्का बसला असून, येथील तब्बल 72 जवान कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी 'सकाळ'ला दिली.

औरंगाबाद : हिंगोलीनंतर औरंगाबादेतील सातारा परिसरातील एसआरपीएफ कॅम्पमध्ये मोठा धक्का बसला असून, येथील तब्बल 72 जवान कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी 'सकाळ'ला दिली.

शुक्रवारी (ता. 8) सकाळच्या सत्रात 18 जणांना कोविड विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुन्हा 72 जवानांना लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. यामुळे कॅम्प चांगलाच हादरला आहे.

रेल्वे अपघातात १५ मजूर ठार, पायी गावाकडे निघाले होते

औरंगाबादच्या सातारा परिसरात राज्य राखीव पोलिस बलाचा कॅम्प आहे. या कॅम्पमधील मालेगावला गेलेल्या जवानाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पुन्हा येथे काही जवानांना लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे जवानांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या तीन डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी (ता. 7) गुरुवारी गेले होते  तेथे त्यांनी सुमारे 134 जणांच्या लाळेची चाचणी केली. तेव्हा 20 जणांना तपासणीदरम्यान घसा आणि खवखवीचा त्रास जाणवत होता असे डॉक्टरांनी सांगितले. जवानांच्या लाळेच्या नमुन्यांचे सॅम्पल गोळा करुन ते घाटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठविले. एकूण 112 सॅम्पलपैकी 72 जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. 

औरंगाबादमध्ये ५० कोरोना हॉटस्पॉट, कोणते ते वाचा

मालेगाव कनेक्शन.. 

सातारा कॅम्पमध्ये मालेगावहून बंदोबस्ताच्या ड्यूटीवरून परत आलेल्या एका जवानाला लागण झाली होती. त्यानंतर आणखी काही जणांना लागण झाली. आता पुन्हा 72 जणांना लागण झाली असून तेही मालेगाववरुन परतले होते. आता एकूण रुग्णसंख्या 396 वरुन 468 पोचली आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. 

कोरोना मीटर 
उपचार घेत असलेले रुग्ण - 426
बरे झालेले रुग्ण - 30
मृत्यू झालेले रुग्ण - 12
एकूण ---------------468


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Updates 72 SRPF Cops Found Positive Now 468 Patients In Total