Corona Updates: औरंगाबादेत रुग्णसंख्या वाढतीच, सध्‍या १५ हजार ६९७ जणांवर उपचार

Aurangabad Corona Updates
Aurangabad Corona Updates

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.एक) दिवसभरात एक हजार ४८१ जण कोरोनाच्या फेऱ्यात अडकले. रुग्णसंख्या ८४ हजार १६० वर पोचली आहे. सध्या १५ हजार ६९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी एक हजार ३२१ जणांना रुग्णालयांतून घरी जाऊ देण्यात आले. त्यात शहरातील एक हजार तर ग्रामीण भागातील ३२१ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ६६ हजार ७५९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार ७०४ जणांचा मृत्यू झाला आहे.

३४ जणांचा मृत्यू
औरंगाबादेत आणखी ३४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तीसगाव येथील पुरुष (वय ४१), खुलताबाद येथील महिला (६२), सिडको एन-चार येथील पुरुष (५६), तीसगाव येथील पुरुष (४१), हर्सूल येथील महिला (६०), भडकलगेट येथील महिला (६८), राहुलनगर, रेल्वेस्थानक येथील महिला (५५), कन्नड येथील पुरुष (५१), कैसर कॉलनी येथील पुरुष (४२), चिंचखेडा (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (७७), अजिंठा येथील महिला (७५), बीड बायपास औरंगाबाद येथील पुरुष (९०), हाराहनगर येथील महिला (७५), लासूर स्टेशन येथील महिला (६६), जुना बाजार येथील पुरुष (५९), घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथील महिला, गंगापूर येथील पुरुष (७०), पडेगाव येथील पुरुष (६०), औरंगाबाद शहरातील महिलेचा (६५) घाटी रग्णालयात उपचादरम्यान मृत्यू झाला. जाधववाडी येथील महिला (४०), हडको येथील पुरुष (७८), गारखेडा परिसर येथील पुरुष (८०), गुरुदत्तनगर येथील महिला (६०), सिडको एन-चार येथील महिला (७५), कोडापूर, ता. गंगापूर येथील पुरुष, आदर्श कॉलनी, कन्नड येथील पुरुषाचा (८०) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
इटखेडा येथील पुरुष (७७), एकता कॉलनी येथील महिला (७७), जवाहर कॉलनी येथील महिला (६३), एमआयडीसी चिकलठाणा येथील पुरुष (५६), एन- नऊ सिडको येथील महिला (६५), देवानगरी येथील पुरुष (६६), चैतन्य नगर येथील पुरूरुष (८९), उल्कानगरी येथील पुरुष (८५), देऊळगाव बाजार, (ता. सिल्लोड) येथील महिलेचा (६७)खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोना मीटर (औरंगाबाद)
-----------------------------
आतापर्यंतचे बाधित- ८४१६०
बरे झालेले- ६६७५९
उपचार घेणारे- १५६९७
आतापर्यंत मृत्यू- १७०४
-----------------------------

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com