esakal | रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News Vijay Zinjurde

त्याचा दोन दिवसांपासून नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वंच ठिकाणी शोध सुरु होता. मात्र तो कुठेही आढळून आला नव्हता.

रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ

sakal_logo
By
दिनेश शिंदे

चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : चित्तेपिंपळगाव (ता.औरंगाबाद) येथून जवळ असलेल्या पांढरी झिंजूर्डे येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह त्याच्याच शेतातील विहिरीत मंगळवार (ता. 23) सकाळी सातच्या सुमारास आढळून आला. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरी झिंजूर्डे येथील विजय जनार्दन झिंजुर्डे (वय 25) हा घरातुन रागाच्या भरात घरांत कुणाला काही न सांगता गेल्या दोन दिवसांपासून  निघून गेला असल्याची तक्रार सोमवारी चिकलठाणा पोलिस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी केली होती.

वाचा - औरंगाबादकरांनो! आजपासून शहरात रात्रीची संचारबंदी होणार लागू

त्याचा दोन दिवसांपासून नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वंच ठिकाणी शोध सुरु होता. मात्र तो कुठेही आढळून आला नव्हता. मात्र दुर्दैवाने मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास त्याच्याच शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. विजय हा अत्यंत हुशार मनमिळाऊ स्वभावाचा, सुशिक्षित मुलगा होता. त्याने डिप्लोमा शिक्षण पूर्ण केले होते. परिसरात त्याच्या अशा या दुर्दैवी जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - गणेश पिटेकर