esakal | Crime News: औरंगाबाद जिल्ह्यात तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना अटक

बोलून बातमी शोधा

crime news}

अटकेनंतर गुन्हेगारांकडून त्यांच्याकडून तलवार जप्त केल्या आहेत

Crime News: औरंगाबाद जिल्ह्यात तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना अटक
sakal_logo
By
शेख मुनाफ/दिनेश शिंदे

आडुळ/चित्तेपिंपळगाव (औरंगाबाद): दोन जण हिरापुर (ता.औरंगाबाद) शिवारात दुचाकी वर तलवार घेऊन फिरत असल्याची खबऱ्या मार्फत माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अटकेनंतर त्यांच्याकडून तलवार जप्त केल्या आहेत.

रविवारी (ता.२८) रोजी सचिन टाके व काकासाहेब पठाडे हे दोन इसम चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीतील हिरापुर (ता.औरंगाबाद) शिवारातील जालना ते औरंगाबाद रस्त्यावरील गुरुपुष्प आपरमेंट समोर दुचाकी क्रमांक एमएच २० एफईवर फिरताना आढळून आले. यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन फुट लांब तलवार सापडली त्यामुळे सचिन भास्करराव टाके (वय 31 वर्षे )रा.आदिनाथ नगर गरखेडा परिसर औरंगाबाद व काकासाहेब जिजा पठाडे (वय 25 वर्षे) रा.वरझडी ता. जि.औरंगाबाद यांना भारतीय हत्यार कायद्याने प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना होऊन गेलाय आणि ठणठणीत बरं व्हायचंय तर मग 'असा' घ्या आहार

त्यांच्या ताब्यातून दोन फूट लांबीची एक धारदार तलवार किंमती दोन हजार रुपये व दुचाकी किंमती चाळीस हजार रुपये असा एकूण 42000/- रुपयेचा (अक्षरी - बेचाळीस हजार रुपये) मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कामगिरी  चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, अजिनाथ शेकडे, रवींद्र साळवे, दिपक देशमुख, दिपक सुरोशे आदींनी केली आहे.