सिटी बसचालकास मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकास जेलची हवा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 January 2021

चालकांचे हे रुद्र रुप पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत त्या रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

औरंगाबाद, ता. २८ ः शहर बसचालक समाधान वानखेडे (४८, रा. देवगिरी कॉलनी, मुकुंदवाडी) यांना मारहाण केल्याप्रकरणात संशयित रिक्षाचालक जफर खान सत्तार खान (२८, रा. कैसर पार्क, नारेगाव) याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी गुरुवारी (ता.२८) दिले. जफर याला २४ जानेवारीला अटक झाली होती. त्याला यापूर्वी गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. 

यापुर्वी सिडको बसस्थानकाच्या आवारात सिटीबस चालकास मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाच्या साथीदारास अटक करेपर्यंत बससेवा सुरु करणार नसल्याचा निर्णय सिटी बस चालकांनी घेतला होता. त्यानंतर मारहाण करणाऱ्या चौघांपैकी एकास सिडको एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरच सिटीबस सुरु करण्यात आली.

Gram Panchayat Election: औरंगाबाद तालुक्यातील 114 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे...

रविवारी (ता.२४) सकाळी सहा वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकाच्या गेटजवळ रिक्षा चालकांनी रस्त्यात अडवून धरला होतो. त्यावेळी सिटीबस घेऊन आलेल्या निवृत्ती वानखेडे या चालकाने रिक्षाचालकास रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर त्या रिक्षा चालकांने वानखेडे यांना मारहाण केली.

अडीच महिन्यानंतरही ५७८ अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

वानखेडेच्या मदतीला धावून आलेल्या सिटी बसच्या चालकालाही त्या रिक्षाचालक व त्यांच्या साथीदाराने मारहाण केली होती. या घटनेची माहिती तात्काळ सिडको एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली होती. दरम्यान पोलिस येईपर्यंत रिक्षाचालक फरार झाला होता. जो पर्यत आरोपील अटक होत नाही तो पर्यंत सिटीबस सेवा सुरु होणार नसल्याचा पवित्रा चालकांनी घेतला होता.

चालकांचे हे रुद्र रुप पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत त्या रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळल्या. आरोपील अटक केले की, नाही याची शहानिशा स्वत: चालकांनी पोलिस ठाण्यात केली. त्यानंतर बससेवेस सुरवात केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad crime news A rickshaw driver who beats city bus driver jail