रुग्ण दगावला..घाटीत नातेवाईकांची तोडफोड 

याेगेश पायघन
सोमवार, 13 जानेवारी 2020

सोमवारी रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर पंधरा ते वीस नातेवाईकांनी गोंधळ घालत काचांची तोडफोड केली. तोडफोड सुरू केल्यानंतर सिक्‍युरिटीने अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनाही मारहाण करण्यात आली. हा प्रकार होत असताना तातडीने बेगमपुरा पोलिसांना कळवण्यात आले.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यायातील घाटी रुग्णालयात मृत रुग्णाच्या 15 ते 20 नातेवाईकांनी मेडिसिन विभागात तोडफोड केलीय. यात नर्सिंग विभाग आणि मेडिसीन विभागाच्या काचा फोडल्यात आल्या. औरंगाबाद शहरातील लोटाकारंजा परिसरातील एका 40 वर्षीय व्यक्ती हृदयविकाराच्या आजारामुळे घाटी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार घेत होता.

हेही वाचा : शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा 

सोमवारी त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर पंधरा ते वीस नातेवाईकांनी गोंधळ घालत काचांची तोडफोड केली. तोडफोड सुरू केल्यानंतर सिक्‍युरिटीने अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनाही मारहाण करण्यात आली. हा प्रकार होत असताना तातडीने बेगमपुरा पोलिसांना कळवण्यात आले.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन 

घाटी रुग्णालयात मेडिसिन इमारतीमधील आयसीयु मध्ये उपचारादरम्यान रुग्ण दगवल्याने नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना तीन वाजेच्या सुमारास घडली. यावेळी जमावाला आवर घालण्यासाठी गेलेल्या दोन सुरक्षा राक्षकांनाही मारहाण केली.

घाटी रुग्णालयात याअगोदर सुद्धा अनेक वेळा तोडफोडीच्या घटना घडून डॉक्‍टरांना मारहाण झालेली आहे. डॉक्‍टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी पेशंटच्या प्रकृती सर्व माहिती देवून सुद्धा नातेवाईकांनी तोडफोड केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Ghati Hospital Doctor Beaten