'सकाळ'चा पाठपुरावा : अखेर कंत्राटी पदांची जाहिरात प्रसिद्ध, महापालिकेनेही केली २४ डॉक्टरांची भरती

मनोज साखरे
Friday, 8 May 2020

जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील पदभरतीबाबत प्रशासनाकडून हालचाली वेगात असतानाच आता घाटी रुग्णालयातर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना रोगाच्या कामासंदर्भात एकत्रित ठराविक वेतनावर कंत्राटी पदांची जाहिरात काढली आहे. ही पदभरतीची जाहीरात घाटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील पदभरतीबाबत प्रशासनाकडून हालचाली वेगात असतानाच आता घाटी रुग्णालयातर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना रोगाच्या कामासंदर्भात एकत्रित ठराविक वेतनावर कंत्राटी पदांची जाहिरात काढली आहे. ही पदभरतीची जाहीरात घाटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

'सकाळ'ने जिल्हा रुग्णालयाला मनुष्यबळाची चिंता या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी याकडे तातडीने लक्ष घालुन प्रत्यक्ष विचारणा केली. निधीही उपलब्ध करुन दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना त्यांनी तात्काळ पदभरतीच्या सुचना केल्या होत्या. यानंतर महापालिकेकडून २४ कंत्राटी डॉक्टरांची भरती पुर्ण झाली आहे.

रेल्वे अपघातात १५ मजूर ठार, पायी गावाकडे निघाले होते

जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांनीही बैठक घेत भरतीबाबत औपचारिकता पुर्ण करण्याच्या सुचना केल्या. यानंतर घाटी रुग्णालयानेही कंत्राटी पद्धतीने विविध पदांची नियुक्तीसाठी जाहिरात रुग्णालयाच्या संकेतस्थळावर www.gmcaurangabad.com प्रसिध्द केली आहे. या पदांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्जात सर्व कागदपत्रांसहित मेलद्वारे १३ मे २०२० पर्यंत सादर करावयाची आहेत, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

घाटीची या पदासाठी जाहिरात

विविध फिजिशियन, डयूटी मेडिकल ऑफिसर (डीएमओ एमबीबीएस/ बीएएमएस/बीएचएमएस), बधिरीकरण तज्ञ , चेस्ट फिजिशियन , इन्टेन्सिव्हीस्ट, बालरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, कान, नाक-घसा तज्ञ, नेफ्रॉलॉजी परिचारिका अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ , कर्मचारी, डेटा एंट्री ऑपरेटर नर्सिंग स्टाफ, सफाईगार इत्यादींची पदासांठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहेत.

औरंगाबादमध्ये ५० कोरोना हॉटस्पॉट, कोणते ते वाचा

महापालिकेने केली २४ डॉक्टरांची भरती

करोनाशी मुकाबला करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कंत्राटी पध्दतीने डॉक्टरांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आधी तीन पद भरली. त्यानंतर गत आठवड्यात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेच्या प्रशासकांना डॉक्टरांची भरती करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ३२ बीएएमएस डॉक्टरांचे अर्ज आले. त्यापैकी १९ जणांना नियुक्ती देण्यात आली. बाकींच्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली असून गरजेनुसार त्यांना नियुक्त्या देण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Government Hospital Published Advertise Of Recruitment