त्यांनी दिला चक्क स्मशानाला चकवा! 

Aurangabad - how to do organ & body donation
Aurangabad - how to do organ & body donation
Updated on

औरंगाबाद - जगात स्मशान कुणाला चुकले, असे नेहमीच आपण ऐकत आलो. प्रत्येकाला एक न एक दिवस स्मशानात विसावेच लागणार आहे, हे सर्वश्रुत आहे; पण येथील सागरबाई केशवराव भालेकर (वय ९४) याला अपवाद ठरल्या. 

त्यांनी चक्क स्मशानालाच चकवा दिला. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूनंतर एमजीएमच्या शरीररचना शास्त्र विभागात बुधवारी (ता.११) त्यांचा देह दान केला. त्यामुळे भविष्यात चांगले डॉक्टर निर्माण होणार आहेत. 

समाज आपल्याला खूप काही देतो. त्यामुळे त्याची परतफेड करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हाच विचार सागरबाई यांनी कायम अंगीकारला. मृत्यूनंतरही आपण समाजाच्या उपयोगी पडावे, या उद्दात हेतूने त्यांनी पंधरा वर्षांपूर्वीच देहदानाचा संकल्प केला होता. बुधवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार आप्तेष्टांनी त्यांचा देह एमजीएमच्या शरीररचना शास्त्र विभागाला दान केला.

 दिवस असो वा रात्र रुग्णसेवेसाठी नेहमीच नेहमीच डॉक्टर धावून जातात; पण विद्यार्थी दशेत बऱ्याच वेळा त्यांना अभ्यासासाठी मानवी देह मिळत नाही; पण सागरबाई यांनी दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयामुळे भविष्यातील चांगले डॉक्टर घडणार आहेत. त्यामुळे इतरांनी देहदानाच्या चळवळीला बळकटी देण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. देहदानातून केवळ डॉक्टरांना अभ्यासच करता येणार नाही तर अवयवांची गरज असलेल्या अनेकांचे प्राणही वाचू शकतात. 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  
 
स्वतः निरक्षर; पण भावी डॉक्टरांनी केले साक्षर 
स्वतः निरक्षर व देवभोळ्या असलेल्या सागरबाईंमुळे एमजीएममधील भावी डॉक्टर देह साक्षर होणार आहेत. सागरबाईंचे पती केशवराव यांचे निधन झाले तेव्हा मृत्यूनंतरचे दशक्रिया किंवा वर्षश्राद्ध असे काहीही विधी करू नका असे त्यांनी सांगितले होते. सागरबाई यांना डॉ. निर्मला कदम, मंगला पाटील, प्रा. उज्ज्वला खंदारे अशा तीन मुली. अरविंद व संजय अशी दोन मुले आहेत. त्यांच्या कुटुंबातील मुले, मुली, नातवंड, पतरुंडे असे सर्व वैद्यकीय, अभियांत्रिकी, वकिली अशा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यापैकी काही जण परदेशात आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com