esakal | बेकायदा टॉवरसाठी जागा देणाऱ्या  मालमत्ताधारकांवरही आता कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad mobile tower

अशा मालमत्ताधारकांकडून थकीत मालमत्ता व पाणीपट्टी कराची सक्‍तीने वसुली करण्याचीच मोहीम राबवली जात आहे

बेकायदा टॉवरसाठी जागा देणाऱ्या  मालमत्ताधारकांवरही आता कारवाई

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: बेकायदा मोबाइल टॉवर उभारणाऱ्या मोबाइल कंपन्यांसह आता महापालिका प्रशासनाने बेकायदा टॉवरसाठी इमारत उपलब्ध करून देणाऱ्या मालमत्ताधारकांवरही कारवाई सुरू केली आहे. अशा मालमत्ताधारकांकडून थकीत मालमत्ता व पाणीपट्टी कराची सक्‍तीने वसुली करण्याचीच मोहीम राबवली जात आहे. रविवारी (ता.सात ) विविध ठिकाणी कारवाई करून थकीत कर वसुली करण्यात आली.

महापालिकेच्या पथकांनी उत्तमनगर, जवाहर कॉलनी येथील बेकायदा मोबाइल टॉवर सिल केले होते. तसेच ज्या इमारतीवर संबंधित टॉवर होते, त्यांच्याकडे पाणीपट्टी थकली होती, त्यामुळे तिथली नळजोडणी रविवारी तोडण्यात आली. किराडपुरा येथे टॉवर सील केल्यानंतर टॉवर असलेल्या मालमत्ताधारक घरमालकाकडून १० हजार रूपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. चिश्तिया कॉलनीत हाजी नूर खान यांच्या इमारतीवरील इंडस कंपनीचे टॉवर सिल केले होते, त्या मालमत्ताधारकाकडून ५० रूपयांचा थकीत कर पथकाने वसूल केला.

मामाचा नाद खूळा ! भाचा सैनिक झाला म्हणून दिलं 'गाव जेवण'

तसेच सिडको एन-१२ येथील एका घरावरील बेकायदा टॉवर सिल केले होते, त्यांच्याकडून मालमत्ता आणि पाणीपट्टी कर असे मिळवून सुमारे ४३ हजार रुपये वसूल करण्यात आले. ही कारवाई महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्‍त तथा कर निर्धारक व संकलक अपर्णा थेटे, विशेष वसुली अधिकारी शिवाजी झनझन व संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी केली. 

(edited by- pramod sarawale)