esakal | 'बर्ड फ्लू'ची भीती घालवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यक्रमात खाल्लं चिकन
sakal

बोलून बातमी शोधा

bird flu

बर्ड फ्लू आजाराच्या विविध अफवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.

'बर्ड फ्लू'ची भीती घालवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यक्रमात खाल्लं चिकन

sakal_logo
By
सुनिल इंगळे

औरंगाबाद : जिल्ह्यात बर्ड फ्लू आजाराची भीती दूर करण्यासाठी जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बुधवारी (ता.३) चिकन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या चिकन महोत्सवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह अधिकाऱ्यांनी चिकन बिर्याणीचा आस्वाद घेतला. तसेच नागरिकांनी बर्ड फ्लूची भीती न बाळगण्याचे आवाहन केले.

राज्यात बर्ड फ्लू आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. परंतु औरंगाबाद जिल्ह्यात बर्ड फ्लूचे एकही केसेस आढळले नाही. मात्र बर्ड फ्लू आजाराच्या विविध अफवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.

शहराला मिळाले नवीन २३ चार्टर्ड अकाउंटंट; अनिरुद्ध ठोंबरे, पराग सोमाणी प्रथम

ही भीती घालवण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती एल. जी. गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकारी यांनी चिकन बिर्याणी खाऊन हा आजार मनुष्याला होत नसल्याचा संदेश दिला.