Corona Vaccine: नाथनगरी पैठणमध्ये भिकाऱ्यांना कोणी लस देता का लस!

corona vaccine in paithan begger
corona vaccine in paithan begger

पैठण (औरंगाबाद): कोरोना विषाणू संसर्गाचे संकट ऐरणीवर असून दिवसेंदिवस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, शासनाने तिसऱ्या टप्प्यात आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देणे सुरू केले आहे; मात्र, रस्त्यांवर किंवा मंदिराशेजारी उभे राहून भीक मागणाऱ्यांकडे आधारकार्ड नाही. त्यांना लस कशी देणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. या समस्येमुळे प्रशासनही संभ्रमात सापडले आहे.

पैठण हे धार्मिक व पर्यटन शहर असल्याने भाविक व पर्यटकांची येथे गर्दी असते. त्यामुळे शहरातील संत एकनाथ महाराज मंदिर व जायकवाडी धरणासह शहरात मंदिराजवळ बसणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून शहरातील नाथमंदिर शनी मंदिर, राम मंदिर, गीता मंदिर, विविध महादेवाचे मंदिर, गोदाकाठ परिसर, शहरातील बसस्थानक, संत ज्ञानेश्वर उद्यान आणि मंदिराशेजारी बसून भीक मागणारे वयोवृद्ध महिला, पुरुष आजही पाहावयास मिळत आहे.

बहुतांश भिकाऱ्यांकडे आधारकार्ड नाही. यामुळे त्यांना लस कोणत्या आधारे लस देणार हा प्रश्न आहे. गत वर्षभरात कोरोना संकटामुळे मंदिरे बंद राहिल्याने भाविकांचे दर्शनासाठी येणे कमी झाले. परिणामी, भिकाऱ्यांना रोख स्वरूपात मिळणारी भीकही बंद झाल्याने त्यांची उपासमार सुरु आहे.

दोन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर मंदिरे उघडल्याने भाविक दर्शनासाठी येवू लागल्यामुळे भिकाऱ्यांना आधार मिळाला होता. परंतु आता मंदिरे बंदमुळे पोटाच्या खळगीचा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आधारकार्ड नसल्याने त्यांचा लसीकरणासाठी देखील विचार केला जाणार नसल्याने मोठी समस्या उद्भवली आहे .

शहरात व नाथमंदिर, जायकवाडी धरण व गोदाकाठ परिसरात फिरणारे भिकारी यांच्याकडे ओळखीचे कोणतेही पुरावे सापडणे अवघड आहे. या व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे या लोकांनाही कोरोना संसर्गाचा धोका असतो . तर संपर्कात येणाऱ्यांना या लोकांपासून धोका असतो. सामाजिक संस्थेला पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने ओळखपत्र तयार करून देण्याची जबाबदारी द्यावी. - कृष्णा लोळगे, अध्यक्ष श्रीसंत नरहरी सामाजिक युवा मंच, पैठण. 

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com