esakal | दिलासादायक! कोरोनाच्या काळात तरुणासह महिलांना मोसंबीच्या गळपासून मिळतोय रोजगार
sakal

बोलून बातमी शोधा

Mosambi Gaal

महिलांना दिवसाकाठी तीनशे ते चारशे रुपये रोज मोसंबीच्या बारीक फळे वेचण्यासाठी मिळत आहे, तर छोटे व्यावासायिक गळलेली मोसंबीची फळे पंचवीस ते तीस रुपये किलो दराने खरेदी करत आहेत. 

दिलासादायक! कोरोनाच्या काळात तरुणासह महिलांना मोसंबीच्या गळपासून मिळतोय रोजगार

sakal_logo
By
गजानन आवारे

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : कातपूर (ता.पैठण) परिसर हा जायकवाडी नाथसागरच्या सान्निध्यात असल्याने येथील शेतकऱ्यांनी शेकडो एकरवर मोसंबीची लागवड केल्यामुळे मोसंबीला येणाऱ्या फळामुळे साधारण जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत मोसंबीच्या बारीक फळांची गळ होते. त्या गळलेल्या बारीक फळांपासून मेडिसीन पावडर तयार होत असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असून अडीच ते तीन हजार क्विंटलचा त्याला भाव आहे. कोरोनाच्या काळात गावातीलच छोटे व मोठ्या तरूणांनी आपल्या गावातच यांचा व्यापार सुरू केल्यामुळे महिलासह तरूणांना सध्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. 

Corona Vaccination: औरंगाबाद शहरातील दीड लाख नागरिकांना लसीकरण

महिलांना दिवसाकाठी तीनशे ते चारशे रुपये रोज मोसंबीच्या बारीक फळे वेचण्यासाठी मिळत आहे, तर छोटे व्यावासायिक गळलेली मोसंबीची फळे पंचवीस ते तीस रुपये किलो दराने खरेदी करत आहेत. सध्या शेतकरीराजा एवढ्या मोठ्या संकटात असून सुद्धा मोठ्या उदार मताने आपल्या शेतातील मोसंबीला गळ लागलेली फळे वेचण्यासाठी महिलांना व तरूणांना ते देऊन मोफत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तरूण आभार मानत आहेत.

दारुसाठी लावली वाईन शाॅपला आग, अग्निशमन दल व पोलिस धावल्याने मोठी दुर्घटना टळली


सध्या कोरोनाच्या काळात गावासह परिसरात कामधंदा नसल्याने मी मोसंबीच्या बारीक गळीची खरेदी करून माझ्या संसाराचा गाडा कसाबसा हाकलत आहे. यामुळे मला दिवसाकाठी पाचशे ते सातशे रुपये बसून मिळत आहेत.
- सोमनाथ लगडे, मोसंबी गळ व्यापारी

माझ्या शेतातील व इतर गावांतील मोसंबी बागायतदांरानी मोसंबीला गळ लागलेली असून गावातील महिलासह तरूणांचा रोजगाराचा प्रश्न पाहून मी माझ्या परीने शेतातील मोसंबीच्या बारीक गळीच्या वेचणीची मोफत संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांना यापासून रोजगार उपलब्ध झाला आहे.
- विठ्ठल दोरखे पाटील, प्रगतिशील शेतकरी
 

संपादन - गणेश पिटेकर