esakal | जखमा कशा सुगंधी! 
sakal

बोलून बातमी शोधा

jakhama kasha sugandhi

आयुष्य एकट्याने व्यतीत करणाऱ्या इलाही यांच्यानंतर वेदनांच्याही विश्‍वात अगदी सूक्ष्मपणे लिहिणारे थोडकेच...

जखमा कशा सुगंधी! 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद: अनाथ होईल जगी वेदना माझ्यानंतर, छळेल तुजला तुझी वंचना माझ्यानंतर..’ ख्यातनाम गझलकार इलाही जमादार यांच्या या ओळी. आज अगदी तंतोतंत लागू पडतात; त्या त्यांच्या गझलेच्या, लेखनप्रवासाच्या अंगाने. अर्थात आयुष्य एकट्याने व्यतीत करणाऱ्या इलाही यांच्यानंतर वेदनांच्याही विश्‍वात अगदी सूक्ष्मपणे लिहिणारे थोडकेच. एखाद्या कवीच्या कवितेची ताकद कवितेतील शब्दांवरून लक्षात येते.

कविता ‘भक्कम’ असली की तिची जागा रसिकांच्या हृदयातच, अगदी गझलकार इलाही यांच्या बाबतीतही तसेच त्यांची जागाही रसिकांच्या हृदयातच म्हणावी लागेल. या लेखाची कवितांच्या ओळींनी सुरवात बहुदा फारशी झालेली नसावी. परंतु, आज अशीच करावी लागेल कारण इलाही आपल्याला सोडून गेले पण कविता, गझल अन् दोह्यांचा ठेवा ठेवून गेले.

'आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत एकही नोकर भरती होऊ देणार नाही', मराठा ठोक...

उर्दू-फारशीतील गझल प्रकार मराठीत रुजत गेला. ख्यातनाम कवींच्या लेखणीतून गझल आणखीनच बहरत गेली. सुरेश भटांनी तिला गझलेच्या परिपक्व साच्यात बसविली. मुळात गझल वास्तवाच्या जवळ नेणारी व काळजाला थेट भिडणारी आहे. ती कोणत्याही भाषेत असली तरीही ती त्याच ताकदीने रसिकांच्या काळजात रुततेच. याच गझलेला श्‍वास देण्याचे काम ‘गझलकार’ नावाने अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या इलाही जमादार यांनी उत्तमरीत्या केले. त्यांना मोठी साथ ‘गझलनवाज’ भीमराव पांचाळे यांची लाभली. त्यांच्या माध्यमातून इलाही जमादार यांच्या गझलांची ताकद महाराष्ट्राला कळाली.

काळजाचे पाणी करून टाकणारी ‘अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा’ ही गझल भीमराव पांचाळे यांनी गायलेली आहे. जणू गझल व भीमराव पांचाळे यांचेच नाते वाटावे. परंतु, ही गझल इलाही जमादार यांची आहे. ती सर्व महाराष्ट्राला परिचित झाली भीमराव पांचाळे यांच्या माध्यमातून. त्यामुळेच ही गझल व पांचाळे यांचे समीकरण बनले. याची चांगलीच प्रचिती इलाहींनाही असल्याने त्यांनाही ही गझल भीमरावांचीच वाटते. ‘‘म्हणूनच मी ती फारशी सादर करीत नाही, माझ्या अन्य व इतरांच्या गझल मी सादर करतो,’’असे मोठ्या मनाने इलाही म्हणायचे. केवळ गझलकारच नव्हे तर एक अभ्यासक, निसर्गाकडे डोळस नजरेने पाहणाऱ्या या गझलकाराने जखमाही सुगंधी करून टाकाव्यात एवढी त्यांची महती आहे. 

Crime News: मुलीकडे एकटक बघणाऱ्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा

इलाही जमादार यांना विविधांगी काव्य प्रकारांचे अभ्यासकच म्हणावे लागेल. त्यांचा उर्दू भाषेचे ज्ञान अवगत करण्याचा प्रयत्न असो की, दोह्यांच्या निर्मितीसाठी त्यांची धडपड यासाठी त्यांनी अभ्यासच केला. अत्यंत सूक्ष्मपणे या सर्व गोष्टींकडे पाहून त्या आत्मसात करीत प्रगल्भ रचना त्यांच्या लेखणीतून जन्माला आल्या. दोहा म्हणजे संत कबीर व संत कबीर म्हणजे दोहा हेच समीकरण होते. अनेक कवी, संतांनी गीतांपासून अभंगापर्यंत अनेक रचना लिहिल्या. परंतु, दोहा हा प्रकार आधीही व आताही हल्ली कुणी लिहितेच असे नाही. परंतु, जमादार यांनी गझल, गीतांसोबतच दोह्यांचीही निर्मिती केली.

त्यांचे पहिले पुस्तक २२५ दोह्यांचे ३२ दिवसांत लिहून पूर्ण झाले. दोहे लिहिण्याचीही एक गोष्ट आहे. त्यांचे एक मित्र उत्तर भारतात गेले होते. तेथून त्यांनी दोन कॅसेट्स आणल्या त्या जमादार यांनी ऐकल्या. या कॅसेटमध्ये कबिरांचे दोहे होते. यानंतर इलाही यांनी दोह्यावर बराचसा अभ्यासही केला, दोहा हा प्रकार मराठीत आणावा हे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी दोह्यांची पुस्तके व इतर साहित्य मिळवून नंतर त्यांनी मराठीतही दोहे लिहायला सुरुवात केली. त्यांनी सव्वा दोनशे दोह्यांचे पहिले पुस्तक अवघ्या महिनाभरात पूर्ण केले. यानंतर त्यांनी पंधरा हजारांवर दोहे लिहिले आहेत. त्यासाठी त्यांचे अपार कष्ट फार कमी लोकांना माहिती आहेत.

सावधान! डी - मार्टच्या फेक लिंकवर क्लिक कराल तर होऊ शकतं नुकसान

समाजातील घडणाऱ्या घटना, व्यवस्थेतील पोकळपण, भ्रष्टाचार, निसर्गातील घडामोडी व व्यक्तींच्या स्वभावासोबतच बदलत्या स्थितीचेही भान या गझलकाराला होते. हे त्यांच्या रचनांमधून जाणवतेच. अगदी सामान्यतः घडणाऱ्या हालचालीवरही त्यांची बारीक नजर होती. याच नजरेतून त्यांनी असंख्य गझल लिहिल्या. ‘‘निसर्गाकडे न्याहाळून बघितल्यास निसर्ग कविता देत असतो; त्यासाठी सूक्ष्म नजर आपल्याकडे हवी. माझे स्वतःचे काहीही नाही मी फक्त लेखनिकाचे व कारकुनाची भूमिका करतो’’ असे एका मुलाखतीत ‘इलाही यांनी सांगितले होते. नेहमीच जमिनीवर राहिलेल्या या गझलकाराचा प्रवासही ‘सायकल’वरुन अविरत पुढेच गेला व पुण्यात छोट्या खोलीतही मोठ्या ‘नजाकतीने’ आयुष्य त्यांनी व्यतीत केले. त्यांचे आयुष्यच ‘शब्दसुरांची भावयात्रा’ होती, ‘भावनांची अनेक वादळे’ आली जखमाही झाल्या, पण त्यांनी शेवटपर्यंत त्या सुगंधीच मानल्या.

(edited by- pramod sarawale)