जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, झारखंडमध्ये आकस्मिक निधन

Jawan Vijay Aurangabad News
Jawan Vijay Aurangabad News
Updated on

चिंचोली लिंबाजी (जि.औरंगाबाद) : चिंचोली लिंबाजी (ता.कन्नड) येथील केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत जवानाचा यांचे रविवारी (ता.२८) झारखंड येथे आकस्मित मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या जवानावर मंगळवारी (ता.३०) सकाळी चिंचोली लिंबाजी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय ज्ञानेश्वर पवार (वय २८, रा.चिंचोली लिंबाजी ता.कन्नड) असे या जवानाचे नाव आहे.   याबाबत अधिक माहिती अशी की, सदर जवान १४ फेब्रुवारी रोजी चिंचोली लिंबाजी येथे वडिलांच्या वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमासाठी येथे आले होते. यानंतर ते आपल्या कर्तव्यावर झारखंड येथे रवाना झाले होते. दरम्यान, रविवारी (ता.२८) झारखंड येथे त्यांचा आकस्मित मृत्यू झाल्याची कुटुंबीयांना माहिती मिळाली.


मंगळवारी त्यांचे पार्थिव गावात आणण्यात आले. कन्नडचे तहसीलदार संजय वारकड, पिशोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एच. बी. बोराडे यांनी सदर जवानाच्या कुटुंबीयांसह काही नागरिकांच्या उपस्थितीत कोरोना नियमाचे पालन शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण परिसरात सॅनीटायझर फवारणी करण्यात आली.  विजय पवार यांच्या पश्चात पत्नी, एक वर्षाची एकुलती एक मुलगी, आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com