'आता कुठवर लॉकडाउन, माझं लगीन गेलय राहून...'

groom waiting
groom waiting

औरंगाबाद: गेल्या वर्षी लग्नसराईच्या तोंडावर कोरोनाचे महाभयानक संकट असल्याने वयात आलेल्या अनेक तरुण-तरुणींचे लग्न होऊ शकले नाही. त्यामुळे धुमधडाक्यात लग्न करु इच्छिणाऱ्या जवळपास सर्वच वधु-वर पित्यांना काढलेली तिथी रद्द करावी लागली होती. पुढच्या वर्षी आपल्या मुलांची लग्न धुमधडाक्यात करुन त्यांचे हात पिवळे करु, अशा बेतात असलेल्या वधुवर पित्यांना कोरोनाच्या कमबॅकने पुन्हा झटका दिल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हात होणारे लग्न कार्यावर नियम व अटीचे बंधने घातली आहेत. शिवाय रजिस्ट्रेड मॅरेजचा पर्याय खुला केला आहे. राज्यात अनलॉक सुरु झाल्यानंतर सर्व परिस्थिती पुर्व पदावर येत असल्याने लग्नाच्या बेडीत अडवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार बसलेल्या अनेक नवरदेव, नवरीच्या पुन्हा लॉकडाउन सुरु झाल्याने हिरमोड झाला आहे.

वय वाढत असल्याने चिंता-
सलग दोन वर्षांपासून लग्न सोहळ्यावर कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने प्रशासनाने बंधने घातली असल्याने नाईलाजाने काढलेली तिथ रद्द करुन लग्न पुढे ढकलावी लागत असल्याने अनेक तरुण, तरुणी ऐज़ बार होत असून ज्यांची लग्न ठरलेली आहे त्याचे ठिक आहे मात्र ज्यांना लग्न ठरवायचे आहेत त्यांना वय वाढत असल्याने चांगला जोडीदार मिळणे अवघड झाले आहे.
 
हुंडा नको फक्त मुलगी द्या-
मानपानाचा विचार केला तर वर पित्याकडून वरदक्षिणा, मानपान, कपडे, भांडी, अगदी सुईपासून सर्व संसारची मागणी केली जात असे. परंतू सध्या दोन वर्षांपासून लग्नसराईवर कोरोनाचे सावट असल्याने नाते जमविण्यासाठी हुंडा नको फक्त मुलगी द्या, अशी मागणी नवरदेव वधू पित्याकडे करताना दिसत आहे.

हृदयद्रावक घटना! गोठ्याला आग लागून बारा शेळ्यांचा आगीत होरपळून मृत्यू
 
लॉकडाउनचा असाही फायदा-
समाजात आज ही अनेक जण वधु पक्षाकडे हुंड्याची तर मागणी करतातच शिवाय चागले मंगल कार्यालय, ऐवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था अशा विविध मागण्या करीत होते. मात्र लॉकडाउनमुळे वर पक्षाकडून फक्त आम्ही घरातील मोजके लोकच लोक येऊन वधूला घेऊन जाऊ असे सांगून एकदिवसीय (वन डे) लग्नावर भर देत असल्याचे चित्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com