हृदयद्रावक घटना! गोठ्याला आग लागून बारा शेळ्यांचा आगीत होरपळून मृत्यू

12 goat died
12 goat died

आडूळ (औरंगाबाद): दाभरूळ येथील शेतकऱ्याच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत गोठ्यात बांधलेल्या बारा बकऱ्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एक म्हैस जखमी झाली आहे तर गहू, ज्वारी, बाजरीसह घरातील धान्य व संसारोपयोगी साहित्य, कपडे व रोख पंधरा हजार रुपये जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार (ता.९) रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.

आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दाभरुळ येथील शेतकरी काकासाहेब माणिक जावळे याची दाभरूळ शिवारात गट क्रमांक १३५ मध्ये चार एकर शेती असून  ते आपल्या पत्नीसह  शेतात राहत होते, शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी शेळीपालन केले होते. त्यांच्याकडे बारा शेळ्या व एक म्हैस होती. नेहमीप्रमाणे सायंकाळी शेतातील कामे आटोपून घरात काकासाहेब जावळे हे बसले असतांना घराशेजारी असलेल्या शेळ्यांच्या गोठ्याला अचानक आग लागली, शेळ्यांचा आवाज आल्याने काकासाहेब जावळे हे पत्नीसह बाहेर आले.

जावळे यांनी आरडाओरड केल्याने शेजारी धावत आले. परंतु लाकडी गोठा असल्याने बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे गोठ्यात बांधलेल्या बारा शेळ्याचा या आगीत जळून कोळसा झाला. तर बाजूलाच बांधलेली म्हैस या आगीत  होरपल्याने गंभीर जखमी झाली, गोठ्याच्या जवळच घर असल्याने या आगीमुळे घरातील संसार उपयोगी साहित्य, गहू, ज्वारी, बाजरी, आदी धान्याच्या गोण्या, कपडे ,रोख पंधरा हजार रुपये  जळून खाक झाले.

जावळे यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. या शेतकऱ्याचे राहते घरच जळल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला असून सदरील शेतकऱ्याने पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com