मेसेज पाठवा अन् साहित्य घरीच मिळवा

माधव इतबारे
बुधवार, 25 मार्च 2020

अनेक जण भाजीपाला, किराणा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी पुढाकार घेत नागरिकांना घरपोच किराना साहित्य व भाजीपाला व औषधी, दूध, गॅस व जीवनावश्‍यक वस्तू पोचविण्यास सुरवात केली आहे. 

औरंगाबाद - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्य व केंद्र शासनातर्फे वारंवार केले जात आहे; मात्र अनेक जण भाजीपाला, किराणा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत. त्यामुळे नगरसेवक तथा भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रमोद राठोड यांनी पुढाकार घेत घरपोच साहित्य पुरविण्यास प्रारंभ केला आहे. 
लॉकडाऊनच्या निर्णयानंतर अत्यावश्‍यक साहित्याचा म्हणजेच किराणा, भाजीपाल्याचा साठा करण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये एकच गर्दी झाली. विशेष म्हणजे गर्दी करू नका, घरात बसून राहिलात तरच कोरोनावर मात करता येऊ शकते, असे शासनाने म्हणणे आहे. मात्र नागरिक गर्दी करून कोरोना वाढविण्यास मदत करत असल्याचे चित्र सुरवातीच्या काळात होते. त्यामुळे भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी पुढाकार घेत नागरिकांना घरपोच किराना साहित्य व भाजीपाला व औषधी, दूध, गॅस व जीवनावश्‍यक वस्तू पोचविण्यास सुरवात केली आहे. ९८२३८७११११ या क्रमांकावर मागणी व आपला पत्ता नागरिकांनी कळवावा, असे आवाहन त्यांनी केले. 

गरजूंना अन्नदान 
लॉकडाऊनच्या काळात शहरातील काही नागरिकांना अडचणीला समोरे जावे लागत आहे. अशा नागरिकांसाठी मोफत फूड पॅकेटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी १०० पॅकेट वाटप करण्यात आल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले. 

टॅंकरने पाणीपुरवठा सुरू 
शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाई असून, नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पोलिसांची परवानगी घेऊन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे प्रमोद राठोड यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad news Send a message and get the essential needs home