
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काम आटोपून ते अड्ड्यावर परत येत असताना त्यांच्या ट्रॅक्टरचे पुढील टायर फुटल्याने ट्रॅक्टर पुलावरून सरळ खाम नदीच्या पात्रात कोसळला...
वाळुज (जि.औरंगाबाद) : ऊसतोडीचे काम आटोपून अड्ड्यावर परतणाऱ्या ऊस तोड कामगाराचा ट्रॅक्टर खामनदीच्या पुलावरून खाली कोसळला आहे. या भीषण अपघातात ट्रॅक्टरमधील चार लहान मुलांसह 10 ऊसतोड कामगार जखमी झाले आहेत. जखमेतील दोन जणाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात शुक्रवारी (ता.5) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लांजी शिवारात झाला.
वरुडी (ता पैठण) येथील रामनाथ रंभाजी शरणागत त्यांची पत्नी मालनबाई रामनाथ शरणागत, मुलगा प्रभाकर रामनाथ शरणागत (35), प्रभाकरची पत्नी मिनाबाई शरणागत (30), सेवन रामनाथ शरणागत (30) त्याची पत्नी अर्चनाबाई (25) व अर्चनाबाई शरणागत यांचा भाऊ व भावजाई असे सर्वजण प्रल्हाद ज्ञानोबा बनसोडे यांच्या शेतातील अड्ड्यावर झोपडी करून राहतात. शुक्रवारी (ता.5) रोजी रामनाम व मालनबाई हे पती-पत्नी वरुड येथे गावी गेले होते. तर त्यांची दोन्ही मुले, दोन्ही सुना व अर्चनाचा भाऊ व भावजय तसेच त्यांची चार मुले असे सर्वजण लांजी जवळील पेरे पाटील यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी गेले होते.
सरपंच व्हायचंय.....तर मग कोरोना चाचणी केलीच पाहीजे!
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काम आटोपून ते अड्ड्यावर परत येत असताना त्यांच्या ट्रॅक्टरचे पुढील टायर फुटल्याने ट्रॅक्टर पुलावरून सरळ खाम नदीच्या पात्रात कोसळला. अंदाजे चाळीस फूट खोल कोसळलेल्या ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला असून ट्रॅक्टर मधील सर्व जण गंभीर जखमी झाले. जखमीतील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच प्रल्हाद ज्ञानोबा बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत सर्व जखमींना 108 रुग्णवाहिकेतून उपचारार्थ घाटीत दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
(edited by- pramod sarawale)