esakal | #BharatBandh: जीएसटीच्या अटींविरोधात आज शहरात व्यापाऱ्यांचा बंद

बोलून बातमी शोधा

strike}

जीएसटी करप्रणालीतील जाचक तरतूदी रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने (कॅट) भारत बंदची हाक दिली आहे

#BharatBandh: जीएसटीच्या अटींविरोधात आज शहरात व्यापाऱ्यांचा बंद
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) जाचक अटी व तरतुदीच्या तसेच महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या व्यवसाय परवानाविरोधात व्यापारी एकवटले असून शुक्रवारी (ता.२६) जिल्हा व्यापारी महासंघ व मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड ट्रेडतर्फे व्यापारपेठ बंद पाळण्यात येणार आहे.

जिल्हा महासंघाशी सलग्न असलेल्या सर्व व्यापारी संघटनानी बंदला पाठिंबा दिल्यामुळे उद्या कडकडीत बंद राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले.

कोरोनाच्या अनुषंगाने शहरात कडक निर्बंध; जाणून घ्या नियमावली

जीएसटी करप्रणालीतील जाचक तरतूदी रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने (कॅट) भारत बंदची हाक दिली आहे. त्यास व्यापारी महासंघ तसेच संलग्न असलेल्या सर्व व्यापारी संघटनेचा पाठिंबा असून शुक्रवारी व्यापारीवर्ग आपआपले दुकाने, प्रतिष्ठाने बंद करुन या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती काळे, मालानी यांनी दिली. ‘कॅट’चे महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजय शहा यांच्या मार्गदर्शनाखाली बंद पाळला जाणार आहे.

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शेतकरी ऊत्पादक कंपन्यांकडून प्रारंभ

बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष काळे, उपाध्यक्ष संजय कांकरिया, विजय जैस्वाल, प्रफुल्ल मालानी, सहसचिव गुलाम हक्कानी, जयंत देवळाणकर, कोषाध्यक्ष अनिल चुत्तर, तनसुख झांबड, बद्रीनाथ ठोंबरे, अनंत बोरकर, कॅनॉट गार्डन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खर्डे, अजय शहा आदींनी केले.