esakal | भाजपा लढणार औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्व जागा
sakal

बोलून बातमी शोधा

BJP will contest all the seats of Aurangabad Municipal Corporation

बूथनिहाय रचनेसह एकूण महापालिका निवडणूक तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला

भाजपा लढणार औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्व जागा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने कंबर कसली आहे. तयारीसाठी शनिवारी (ता. १६) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. यात सर्वच्या सर्व जागा लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, विविध समित्या स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आली आहेत.

महावीर भवन येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, माजी मंत्री गिरीष महाजन, संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, शहराध्यक्ष संजय केणेकर, माजी महापौर भगवान घडमोडे व प्रमुख नेते उपस्थित होते.

Corona Vaccination: लसीकरणानंतर किरकोळ त्रास; काही जणांना थंडीताप, मळमळ, हलकी अंगदुखी

बूथनिहाय रचनेसह एकूण महापालिका निवडणूक तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला. दरम्यान, मिशन ६० प्लस हाती घेण्यात आले असून, सर्वच्या सर्व जागा लढणार असल्याचे यावेळी नेत्यांनी सांगत कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, या बैठकीनंतर पुराणिक, महाजन यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची अन्य एक बैठक झाली. त्यात पुढील कृती कार्यक्रम, व्ह्यूरचना यावर चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.