Breaking News : मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी, औरंगाबादेतील रुग्णाचा मृत्यू

मनोज साखरे
Sunday, 5 April 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे तीन एप्रिलला सायंकाळी सव्वा सहा वाजता एक ५८ वर्षीय पुरुष भरती झाला होता. कोविड-१९ चा संशयित म्हणून रुग्णाला भरती केले होते. त्याचा पाच एप्रिलला सकाळी आठ वाजता त्याच्या स्वॅब नमुन्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

औरंगाबाद : शहरात २१ वर्षीय तरुण आणि ४५ वर्षीय गृहिणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर रविवारी (ता.५) शहरातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातच एका ५८ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती डॉ. कानन येळीकर यांनी 'सकाळ'ला दिली. या आजाराचा शहरातील व मराठवाड्यातील हा पहिलाच मृत्यू आहे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे तीन एप्रिलला सायंकाळी सव्वा सहा वाजता एक ५८ वर्षीय पुरुष भरती झाला होता. कोविड-१९ चा संशयित म्हणून रुग्णाला भरती केले होते. त्याचा पाच एप्रिलला सकाळी आठ वाजता त्याच्या स्वॅब नमुन्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णाला दहा वर्षापासून उच्च रक्तदाब मधुमेह ह्रदयविकाराचा आजार होता. रुग्णाचा रविवारी दुपारी साडेबारा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शहरात अशी आहे रुग्णसंख्या

शहरातील कोरोनाचा धोका वाढला आहे. सध्या औरंगाबाद शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात ४, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २ तर एका रुग्णावर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी ‘सकाळ’शी बोलतांना दिली. 

औरंगाबाद शहरात १३ मार्च रोजी एका ५९ वर्षीय प्राध्यापक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर या महिलेचा अहवाल नेगिटीव्ह आला. मात्र त्यानंतर पुण्याहुन परलेल्या २१ वर्षीय तरुण आणि दिल्ली-मनाली पर्यटनाहुन आलेल्या ५५ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याने शहरात अनेकांनी त्याची धास्ती घेतली आहे. हे परिसर प्रशासनाने सील केले. यानंतर रविवार हा औरंगाबाद मधील रहिवाशांना धक्का देणार ठरला असून, तब्बल पाच जणांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking News First Death In Aurangabad By Coronavirus