esakal | साहेब खर्चही निघाला नाही, केंद्रीय पथकापुढे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
sakal

बोलून बातमी शोधा

Central Team Visit Heavy Rain Hit Aurangabad District

केंद्रीय पथक औरंगाबाद जिल्ह्यातील निपाणी येथे आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी सोमवारी (ता.21) सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाले आहे.

साहेब खर्चही निघाला नाही, केंद्रीय पथकापुढे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद  ः केंद्रीय पथक औरंगाबाद जिल्ह्यातील निपाणी येथे आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी सोमवारी (ता.21) सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाले आहे. येथील शेतकरी नंदू भालेकर यांच्या शेतातील मका, बाजारी आणि सोयाबीन पिकांची पथकाने पाहणी केली. या प्रसंगी शेतकऱ्याला राज्य सरकारची मदत मिळाली का? खत,  बियाणांसाठी पैसे मिळाले का? असे प्रश्न विचारण्यात आले. यावेळी  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पथकाला गेल्या वर्षीची मदत दिल्याचे सांगितले. 

शहराच्या ब्रॅन्डिंगवरुन तापले राजकारण, लव्ह औरंगाबादला सुपर संभाजीनगरचा पर्याय

शेतकरी सखाराम पुंगळे यांनी पाच एकरावर कपाशी लावली होती. अतिवृष्टीने कपाशीचे नुकसान झाले. त्यांना केवळ तीन क्विंटल कपाशीचे उत्पन्न मिळाले आहे. केंद्रीय पथकाला पुंगळे म्हणाले, की साहेब खर्चही निघाला नाही. मजुरांचा खर्चच जास्त झाला होता. निपाणीतील तिसरे शेतकरी लहुजी भालेराव यांच्या अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण  उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर