esakal | मुख्य पोस्ट मास्तरसह चौघांविरूध्द गुन्हा दाखल, ४ लाख ३५ हजारांची रक्कम परस्पर वळवण्यात आली
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

चुलत भावाच्या बनावट सह्या करून पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यातून ४ लाख ३५ हजारांची रक्कम परस्पर वळवण्यात आली. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात पोस्ट मास्टर कोळीसह चार जणांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य पोस्ट मास्तरसह चौघांविरूध्द गुन्हा दाखल, ४ लाख ३५ हजारांची रक्कम परस्पर वळवण्यात आली

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : चुलत भावाच्या बनावट सह्या करून पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यातून ४ लाख ३५ हजारांची रक्कम परस्पर वळवण्यात आली. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात पोस्ट मास्टर कोळीसह चार जणांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तुषार सुभाष दरक, मुख्य पोस्ट मास्टर कोळी, संजीतकुमार आणि बोलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पदवीधर निवडणूक : मराठवाडा प्रस्थापितांकडे का?


सिडको टाऊन सेंटर येथील गोविंद ओमप्रकाशजी दरक (४०) यांचा बियाणांचा व्यापार आहे. त्यांचे जुनाबाजार येथील पोस्ट आफीस मध्ये बचत खाते आहे. त्यांनी ८ एप्रिलरोजी बचत खात्यात ४ लाख ३५ हजारांची रक्कम भरली होती. रक्कम भरल्यानंतर त्यांचा चुलत भाऊ तुषार सुभाष दरक याने पोस्ट आफीसमध्ये बचत खाते उघडून गोविंद यांच्या बनावट सह्या करून त्या स्वतःच्या खात्यात वळती करून घेतले. १९ आगस्ट रोजी गोविंद दरक हे पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना खात्यातून रक्कम गायब झाल्याचे दिसून आले.

कोळींचा प्रताप
गोविंद यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली असता पोस्ट कर्मचाऱ्यांनी गोविंद यांच्या खात्यातील रक्कम ही तुषार यांच्या खात्यात वळती करण्यात आल्याचे सांगितले. तसेच रक्कम वळती होताच तुषार यांनी बँकेतून ती रक्कमही काढून घेतली. तुषार यांनी पोस्ट आफिसच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून रक्कम गायब केल्याचे दिसून आले. सिटीचौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक एस. के. खटाने यांनी तुषार सुभाष दरक, मुख्य पोस्ट मास्टर कोळी, संजीतकुमार आणि बोलकर विरूध्द गुन्हा दाखल केला.

Edited - Ganesh Pitekar