मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा औरंगाबाद दौरा आटोपता; जाणून घ्या काय झालं या दौऱ्यात

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 5 February 2021

दुपारी 12:51 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमण झाले होते

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आजचा (5 फेब्रूवारी) औरंगाबाद दौरा जवळपास दीड तासांच्या आत आटोपला. दुपारी 12:51 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमण झाले होते. आजची मुख्यमंत्र्यांची बैठक जवळपास तासभर चालली. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा-

  • शासनाच्या विविध योजना, सिंचन आणि जलसंधारण योजनांचा आढावा घेतला.
  • पर्यावरणविषयक आढावा. 
  • शहरातील विकासकामे आणि स्मार्ट सिटीअंतर्गत कामांचा आढावा
  • मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना शहर आणि जिल्ह्यातील विकास कामाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरवून कळवावे असंही सांगितलं आहे. त्या विकासकामांना शासन म्हणून जी मदत अपेक्षित आहे ती मदत केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.
  • अजिंठा आणि वेरुळ पर्यटनस्थळांच्या विकासकामांचीही माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली.
  • यापुर्वी जानेवारी 2020 मध्ये मुख्यमंत्र्यांनी जी विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली होती, त्यात चर्चा झालेल्या कामांचाही आढावा घेतला.
  •  कोणतीही नवीन घोषणा नाही.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबादेत मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी...

या बैठकीला पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदीपान भूमरे, राज्यमंत्री अब्दूल सत्तार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकेर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, पोलिस आयुक्त निखील गुप्ता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray visit Aurangabad what Aurangabadkars got from this visit