मुख्यमंत्री ठाकरेंनी केला औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान, रस्ते अपघात कमी झाल्याने गौरव

मधुकर कांबळे
Monday, 18 January 2021

सर्वोच्च न्यायालयाने राज्य रस्ता सुरक्षा समितीला रस्ते अपघात मूत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण १० टक्याने कमी करण्याचे उद्दिष्ट दिलेले होते.

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सन्मान केला. रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यामध्ये रस्ते अपघात कमी केलेले आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे, यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी चव्हाण यांचा सत्कार सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उदघाटन सोहळ्यात सोमवारी (ता.१८) सत्कार करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य रस्ता सुरक्षा समितीला रस्ते अपघात मूत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण १० टक्याने कमी करण्याचे उद्दिष्ट दिलेले होते. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अधिनस्त समितीने सुनियोजन पद्धतीने काम केले. शहरातील अपघात व मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी शहरातील अपघात प्रवणक्षेत्र असलेल्या ठिकाणी तत्कालिन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, तत्कालिन प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी एकत्रित भेट देऊन उपाययोजना सूचविल्या. या पुरस्कारानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Uddhave Thackeray Honored Collector Aurangabad Latest News