esakal | औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणतात, लॉकडाऊन शेवटचा पर्याय...

बोलून बातमी शोधा

aurangabad}

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी (ता. सहा) कोरोना रुग्णांची संख्या ४५९ इतकी झाली आहे

औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणतात, लॉकडाऊन शेवटचा पर्याय...
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: कोरोना रूग्णांची वाढती संख्या ही सर्वांच्या चिंतेत भर घालणारी नक्कीच आहे. कोरोना रूग्णसंख्या अटोक्यात आणण्यासाठी सध्या असलेले निर्बंध आणखी कडक केले जातील. आणखी दोन दिवस कोरोनाबाधितांचे आकडे पाहून लॉकडाऊनबाबत प्रशासन निर्णय घेईल असे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी स्पष्ट केले.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या ४५९ वाढली आहे, यामुळे शहरात सोमवारपासून लॉकडाऊन सुरू होणार असल्याच्या अफवांनी जोर धरला. या पार्श्‍वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी स्पष्ट केले की, रोज कोरोनाबाधितांचे वाढणारे आकडे सर्वांच्या चिंतेत भर टाकणारे आहेत.

धक्कादायक! उस्मानाबाद शहराजवळ बिबट्याचा गूढ मृत्यू; परिसरात खळबळ

महापालिका हद्दीत ३५३ तर ग्रामीणमध्ये १०६ असे ४५९ रुग्णसंख्या झाली आहे ही संख्या अटोक्यात आली नाही तर आणखी कडक निर्बंध लावण्याशिवाय पर्याय नाही. कोरोना लसीकरण सुरू झाले असले तरी मास्क इज बेस्ट व्हॅक्सिन. प्रत्येकाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. रोज आकडे कमी जास्त होत आहेत. हे आकडे कमी व्हावेत यासाठी सध्या असलेले निर्बंध आणखी कडक करावे लागतील. रात्रीच्या संचारबंदीची वेळ ११ पुर्वी करावी लागेल.

सोलापूरच्या खासदारांचे बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; तलमोडच्या चौघांची चौकशी

ज्या भागातुन कोरोना रूग्ण वाढत आहेत त्या भागातील दैनंदिन विश्‍लेषण करून त्या भागात आणखी काय उपाययोजना करता येतील का याबाबत विचार केला जाणार आहे. येत्या दोन दिवसात कोरोनारूग्णांची संख्या पाहून लॉकडाऊन करायचे किंवा निर्बंध कडक करायचे याबाबत जिल्हा प्रशासन बैठक घेऊन निर्णय घेईल असे स्पष्ट केले.