ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत वाद, छगन भुजबळांना महत्त्व देत नसल्याने घोषणाबाजी

Banner
Banner

करमाड (जि.औरंगाबाद) : लाडगाव (ता.औरंगाबाद) येथील छत्रपती लॉन्समध्ये शनिवारी (ता.पाच) ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाची मराठवाडा विभागीय बैठक पार पडली. यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन हे बाळासाहेब सानप यांनी केले होते. दरम्यान, या विभागीय बैठकीला बॅनरबाजीपासूनच ग्रहण लागल्याचे दिसून आले. जालना महामार्गावर ठिकठिकाणी लागलेल्या बॅनरवर आयोजक म्हणून नाव असलेले श्री.सानप यांचा ओबीसी नेते म्हणून उल्लेख करण्यात आला. याच वेळी यावर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.

दरम्यान, कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे फक्त छायाचित्र छापण्यात येऊन त्यांचे नाव व पदाचा कुठलाही उल्लेख त्यावर करण्यात आला नव्हता. सोबतच कार्यक्रमाच्या ठिकाणाचाही समजेन असा पत्ता दिला नसल्याने शनिवारी सकाळ पासुनच या कार्यक्रमाची उलट-सुलट चर्चा सुरू होती. यातच कार्यक्रम सुरू असताना बालाजी शिंदे यांचे भाषण सुरू असताना श्री.शिंदे यांनी छगन भुजबळ यांच्या विषयी नकारात्मकता व्यक्त केल्याने समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत त्यांचे भाषण थांबवले.

ओबीसी समाजासाठी छगन भुजबळांचे कार्य मोठे असल्याचे सांगत समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके व कार्यकर्त्यांकडून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रम स्थळावरील बॅनरवरही छगन भुजबळ यांचे छायाचित्र छापलेले नव्हते. यावरही कार्यक्रमात चांगलीच खडाजंगी झाली. हे सर्व मंत्री वडेट्टीवार यांच्या समोर घडले. शेवटी श्री. वडेट्टीवार यांनी मध्यस्थी करत प्रकरण शमवताना श्री.भुजबळ यांचे समाजाविषयीचे कार्य मोठे असल्याचे सांगत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यामुळे संपूर्ण बैठकीत कुजबुज सुरू होती.

संपादन - गणेश पिटेकर    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com