आता गर्दी कराल तर गुन्हे दाखल होणार

शेखलाल शेख
गुरुवार, 19 मार्च 2020

टपऱ्या, पानटबऱ्या बंद कर आहोत. बार, रेस्टारंट संबंधी सुद्धा लवकरच निर्णय घेऊ अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गुरुवार (ता.१९) पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबादः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढील दहा ते पंधरा दिवस अतिशय महत्वाचे असून आवाहन करुन सुद्धा अपेक्षेप्रमाणे गर्दी कमी झालेली नाही. आता यापुढे गर्दी केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. आवश्‍यकता असेल तरच बाहेर पडा. टपऱ्या, पानटबऱ्या बंद कर आहोत. बार, रेस्टारंट संबंधी सुद्धा लवकरच निर्णय घेऊ अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गुरुवार (ता.१९) पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाच्या बाबती अनेकांमध्ये समज गैरसमज आहे. सध्या आपत्ती व्यवस्था कायदा लागू केला असून यामध्ये लोकांच्या सहकार्याची गरज आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी शासनाने शाळा, महाविद्यालये बंद केली आहे. पर्यटन स्थळे सुद्धा बंद करण्यात आली.

आता शासनकीय कार्यालयात सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय योजन केल्या जात आहे. शंभर टक्के कार्यालये बंद शक्य नाही. मात्र कार्यालयप्रमुखांच्‍या आदेशाने ५० टक्के कमर्चारी आळीपाळीने काम करु शकतील. महसूल मध्ये मात्र असे राहणार नाही. स्थानिक पातळीवर शासकीय बैठका घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

नागरीकांनी त्यांचे कामे ई-मेला द्वारे सांगावी. जे आता जुमानणार नाही त्यांच्यावर पोलिस बळाचा सुद्धा वापर केला जाईल. तसेच हरिनाम सप्ताह पण बंद करण्याच्या सूचना केल्या आहे. याचे पालन झाले नाही तर गुन्हे दाखल केले जातील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update Aurangabad News