औरंगाबादकरांनो सावधान सलग दुसऱ्या दिवशी तिघांचे अहवाल पाॅझिटिव्ह

शेखलाल शेख
Wednesday, 8 April 2020

आता औरंगाबादेतील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ही १७ झाली असून पंधरा जणांवर उपचार करण्यात येत आहे. यामध्ये एका रुग्णाचा मृत्यु झाला असून एकावर उपचार सुरु आहे. 

औरंगाबादः शहरात कोरोनाचा धक्क्यांवर धक्के सुरु असून मंगळवार (ता.७) रोजी तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर बुधवार (ता.८) रोजी आणखी तिघांच अहवाल पॉझिटीव्ह आले आहे.

विशेष म्हणजे सोमवारी सुद्धा घाटी रुग्णालयातील परिचारकाचा अहवाला पॉझिटीव्ह आला होता. आता औरंगाबादेतील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ही १७ झाली असून पंधरा जणांवर उपचार करण्यात येत आहे. यामध्ये एका रुग्णाचा मृत्यु झाला असून एकावर उपचार सुरु आहे. 

बुधवार (ता.८) रोजी पॉझिटीव्ह आलेल्यांच्या अहवालात अहबाब कॉलनी येथील जॉर्डन येथून परतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील महिलेस कोरोना लागण झाली आहे. तसेच किराडपुरा परिसरातील एका व्यक्तीला सुद्धा लागण झाली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पेशवेनगर येथील व्यक्तीच्या घरातील एक महिला आणि एक तरुणाला कोरोनाची लागण झालेली असतांना त्यांच्यासाठी बुधवारी आणखी धक्का देणारा ठरला. त्यांच्या कुटुंबातील आणखी एका तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कटुंबातील सध्या तिघांवर उपचार सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update Aurangabad News