
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता. ८) दिवसभरात १ हजार ३६२ कोरोनाबाधितांची भर पडली. उपचारादरम्यान २२ जणांचा मत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच संख्या आता ९४ हजार ३५ वर गेली झाली.
सध्या १४ हजार ८४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी १ हजार ३९२ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ७७ हजार २९५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे.
वडोद येथील पुरुष (वय ५५), वडोद बाजार (ता. फुलंब्री) येथील पुरुष (५६), सिडको एन- आठ येथील पुरुष (७५), नाथ निकेतन कॉलनी (ता. पैठण) येथील पुरुष (७५), सातारा परिसर येथील पुरुष (३५), सिल्लोड (ता. औरंगाबाद) येथील पुरुष (६०), हडको नवजीवन कॉलनी येथील पुरुष (६२), अंगुरीबाग येथील पुरुष (७६), सिडको येथील महिला (४५), राजा बाजार येथील पुरुष (७५), मूर्तिजापूर, औरंगाबाद येथील पुरुष (६५), पाचोड (ता. पैठण) येथील महिला (३५), सिडको येथील पुरुष (५८), शिवाजीनगर येथील पुरुष (७४),
इटखेडा, औरंगाबाद येथील पुरुष (७३), सिल्लोड येथील महिला (७०), पडेगाव येथील पुरुष (२५), भिवगाव (ता. औरंगाबाद) येथील पुरुष (८२), पिंपळगाव आळंद येथील पुरुषाचा (७४) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.
अय्यप्पा नगर, औरंगाबाद येथील महिलेचा (७०) जिल्हा सामान्य रुग्णालयात तर सावळदबरा, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद. येथील पुरुष (५५), चिकलठाणा येथील पुरुष (५०), ठाकरे नगर, एन - दोन सिडको येथील पुरुषाचा (७२) खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबादपेक्षा नांदेड पुढे….
रुग्णवाढ, मृतांचा आकडा औरंगाबादपेक्षा आज नांदेडला जास्त असल्याचे दिसले. नांदेडमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या ९९६ झाली आहे. दिवसभरात एक हजार ४५० रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ५२ हजार ३४२ वर पोचली असून ४० हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. दहा हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लातुरात दिवसभरात हजार पार रुग्ण
लातूर जिल्ह्यात बुधवारी (ता. सात) एक हजार दहा जणांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत दिवसभरातील रुग्णसंख्या वाढीचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. रुग्णसंख्या ३९ हजार १४९ वर पोचली असून ३० हजार ८८८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ७ हजार ४६८ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७९३ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना मीटर (औरंगाबाद)
आतापर्यंतचे बाधित ९४०३५
बरे झालेले ७७२९५
उपचार घेणारे १४८४५
एकूण मृत्यू १८९५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.