Corona Updates: औरंगाबादेत ३८ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४४ हजार ९८३ कोरोनामुक्त

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 18 January 2021

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ४९७ झाली.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता. १७) एकूण ३८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ४९७ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २२६ जणांचा मृत्यू झाला.

सध्या एकूण २८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजच ५१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४४ हजार ९८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.

मनपा हद्दीतील कोरोनाबाधित- अजंता, कॅनॉट गार्डन (१), गजानन मंदिर (१), सिंधी कॉलनी (१), बन्सीलाल नगर (२), भवानी चौक (१), बजाज नगर (१), घाटी परिसर (२), एन सात, सिडको (१), गारखेडा परिसर (१), साई नगर (१)अन्य (१६), ग्रामीण भाग ः अंजनडोह येथे (०१) व अन्य (०९)

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण - ४४९८३
उपचार घेणारे रुग्ण - २८८
एकूण मृत्यू - १२२८
आतापर्यंतचे बाधीत - ४६४९७
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates in aurangabad city and rural part of aurangabad district