औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा! 24 तासांत 371 जणांना कोरोनाची लागण तर 7 रुग्णांचा मृ्त्यू

corona updates
corona updates

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांतील कोरोनाची आकडेवारी पाहिली तर औरंगाबादकरांची चिंता वाढवणारी आहे. कारण याकाळात तब्बल 371 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच ही आकडेवारी मागील कित्येक आठवड्यानंतरची सर्वोच्च वाढ ठरली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात 24 तासांत 308 जणांना (मनपा 279, ग्रामीण 29) डिस्चार्ज दिला आहे. आजपर्यंत 47 हजार 564 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 371 रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 51 हजार 287 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1278 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सध्या 2 हजार 445 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनानी दिली आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (307) अग्रसेन विद्या मंदिर (1), महेश नगर (1), हडको (2), छावणी (1), भुजबळ नगर (1), पडेगाव (1),एन-9 (4),जाधववाडी (1), मयुरपार्क (7),किलेअर्क (2), साफल्य नगर (1), झांबड इस्टेट (1),तापडीया नगर (1),दर्गा रोड (1), बीड बायपास (8), गारखेडा (4),साऊथ सिटी, सिडको (1),पदमपुरा (1), बेगमपुरा (1), शहानुरवाडी (3), समता नगर (1), बन्सीलाल नगर (5) टिळक नगर (1), ज्योती नगर (2), नूतन कॉलनी (1), फकीरवाडी (2), पडेगाव (3), एस बी कॉलनी (1), श्रेयनगर (2), उस्मानपुरा(5), पन्नालाल नगर (1), हॉटेल ग्रीनव्हॅली (1), कोटला कॉलनी (1),हर्सूल (8), शिवशंकर कॉलनी (1),देवळाई रोड परिसर (5), उल्कानगरी (6),विशालनगर (1),खोकडपुरा (2),मलबार चौक (1),विश्वभारती कॉलनी (1),पैठण गेट परीसर (2),अंबिका नगर (1), एन-5  (2) सातारा परिसर (4), सिडको, एन-3 (2), एन-4 सिडको (3), एन-2 (2), जयभवानी नगर (2), अनविका रेसिडेन्सी (1), एन-6 सिडको (2), श्री भिमसिंग विद्यालय परिसर (1)

मुकुंदवाडी (3),एन-1 सिडको (6),पारिजात नगर (1),म्हाडा कॉलनी धूत हॉस्पटलजवळ (1), खडकेश्वर (2),जे जे हॉस्पिटल (3),रेल्वे स्टेशन रोड परिसर (1), भारतमाता नगर (2), रायगड नगर सिडको (1), पिसादेवी परीसर (1), नारळीबाग (1),बुकपॅलेस, औरंगपुरा (1),समर्थ नगर (1), टिव्ही सेंटर (1), बन्सीलाल नगर (1),  साईनाथ हौ. सोसायटी (1), ज्ञानेश्वर नगर (1), शिवाजी नगर (1), नारळीबाग (1), नक्षत्रवाडी (1),सिग्मा हॉस्पीटल (1), व्यंकटेश नगर (1), आकाशवाणी (3), पुंडलिक नगर (1), इंडुरन्स कंपनी (1), बालाजी नगर (2), खडकेश्वर (1), दिल्ली गेट परिसर (1), शासकीय दुध डेअरी (1), पीर बाजार (1), पुष्पनगरी (1), चेलीपुरा (1), घाटी परिसर (3), वृंदावन कॉलनी (1), बसैये नगर (1), जालान नगर (1), न्यू शांतिनिकेतन कॉलनी (2),शहानूरवाडी (1),प्राईड टॉवर (1),नागेश्वरवाडी (1), शिवशंकर कॉलनी (1), विद्यानगर (1), ज्ञानेश्वर मंदीर सिडको (1), गारखेडा (1), अन्य (130)
ग्रामीण (64) वैजापूर (3),सिडको वाळूज(3), कन्नड (2), मुर्तीजापूर (2),बजाजनगर (9), तिसगाव (1),रांजणगाव (1),गंगापूर (1), फुलंब्री (2), अन्य (40)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू 
घाटीत समता नगरातील 80 वर्षीय पुरूष, एन सहा सिडकोतील 68 वर्षीय पुरूष, पुंडलिक नगरातील 88 वर्षीय पुरूष, एन चार सिडकोतील 80 वर्षीय पुरूष, सिल्लोड येथील 77 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात जालना रोड येथील 75 वर्षीय पुरूष, शहानूरवाडीतील 38 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com