esakal | ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार... 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

विद्यार्थी ऑनलाइन शाळा सुरू झाल्यामुळे सकाळी तीन ते चार तास त्यानंतर दुपारी पुन्हा चारतास असे तब्बल सात ते आठ तास मोबाईल, लॅपटॉप, टॅबच्या स्क्रीनवर वेळ घालवत आहे

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार... 

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा, महाविद्यालयात ऑनलाइन प्रणाली वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सहा ते सात तास ऑनलाइन क्लास घेतले जात आहेत. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवरील स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांना आता डोळ्यांच्या समस्या जाणवत आहेत. यामुळे पालक आणि पाल्याची डोकेदुखी वाढली आहे.
 
ऑनलाइन शिक्षणासाठी खासगी इंग्रजी शाळांकडून झूम ॲप, गुगल मीटच्या माध्यमातून अभ्यासवर्ग सुरू करण्यात आले. त्यासाठी तासिकांचे वेळापत्रक तयार करण्यात आले. तर सरकारी शाळांमध्ये दीक्षाॲपच्या माध्यमातून वेगवेगळे संकेतस्थळ देत विद्यार्थ्यांना मोबाईलची सवय लावली. विद्यार्थी ऑनलाइन शाळा सुरू झाल्यामुळे सकाळी तीन ते चार तास त्यानंतर दुपारी पुन्हा चारतास असे तब्बल सात ते आठ तास मोबाईल, लॅपटॉप, टॅबच्या स्क्रीनवर वेळ घालवत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ऑनलाइन अभ्यासवर्गासाठी विद्यार्थी तासनतास मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे ताणून पाहतात. यामुळे डोके दुखणे, डोळ्यांची जळजळ, झोप अपूर्ण होणे, मोबाईल बंद केल्यावर समोरचे न दिसणे, अथवा अंधुक दिसणे, उभे राहिल्यावर डोके गरगरणे अशा समस्या वाढू लागल्या आहेत. मुलांचा ऑनलाइनवरील वेळ वाढल्याने काही विद्यार्थ्यांच्या चष्म्याचा नंबरमध्ये देखील वाढ झाल्याचे पालकांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या समस्येत वाढ 
- डोके जड पडणे, मान दुखणे 
- इयरफोन वापरल्याने कान ठणकणे 
- डोळ्यांची जळजळ, चक्कर येणे, चष्म्याचा नंबर वाढणे 
- मानसिक तणावात वाढ 


 
‘‘काही शाळांकडून सहा ते सात तास क्लास घेतले जात असल्याने डोळ्यांच्या आजारात वाढ झाली आहे. मुलांचे डोळे खूप नाजूक असतात. मोबाईलच्या स्क्रीनचा प्रकाश प्रखर असतो, त्यावर एकटक पाहिल्यामुळे प्रकाश परावर्तनामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे डोळे जळजळ करणे, डोके दुखणे, झोप न लागणे, अंधुक दिसणे अशी लक्षणे जाणवू लागतात. 
- डॉ. रंजना देशमुख, नेत्ररोगतज्ज्ञ, 

 

go to top