esakal | औरंगाबाद जिल्ह्यात नवे ५५ कोरोनाग्रस्त, सध्या एकूण ५७४ रुग्णांवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता. १५) ५५ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णांची संख्या ४१ हजार ५९७ झाली. ५७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात नवे ५५ कोरोनाग्रस्त, सध्या एकूण ५७४ रुग्णांवर उपचार

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता. १५) ५५ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णांची संख्या ४१ हजार ५९७ झाली. ५७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३९ हजार ९०५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार ११८ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) ः बेगमपुरा (१), व्यंकटेश नगर (२), शिवाजीनगर (१), श्रेयनगर (१), मार्ड होस्टेल (२), हरिकृष्णनगर (१), न्यू नंदनवन कॉलनी (१), आदित्यनगर (१), नाथनगर (१), बीड बायपास (२), भाग्यनगर (१), जालननगर (२), एन बारा सिद्धार्थनगर (२), पिसादेवी रोड (१), उल्कानगरी (१), अन्य (२६).

Diwali Bhaubeej 2020 : आज पाडवा, भाऊबीज एकाच दिवशी साजरी होणार


ग्रामीण भागातील रुग्ण
पैठण (१), कन्नड (३), शिवनगर कन्नड (१), वाहेगाव, गंगापूर (२), वैजापूर (१), महालगाव, गंगापूर (१).
 

मृत्यू जोड
घाटी रुग्णालयात भारतनगरातील ७२ वर्षीय पुरुष, कैलासनगरातील ७५ वर्षीय महिला तर उत्तरानगरीतील ४९ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ४२ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

Edited - Ganesh Pitekar