Corona Update : औरंगाबादेत ३०३ रुग्ण बरे, जिल्ह्यात वाढले १२० कोरोनाबाधित

प्रकाश बनकर
Thursday, 8 October 2020

औरंगाबाद उपचारानंतर बरे झालेल्या जिल्ह्यातील आणखी ३०३ जणांना बुधवारी (ता.सात) सुटी देण्यात आली.

औरंगाबाद : उपचारानंतर बरे झालेल्या जिल्ह्यातील आणखी ३०३ जणांना बुधवारी (ता.सात) सुटी देण्यात आली. दरम्यान, दिवसभरात १२० कोरोना रुग्णांची भर पडली. अँटीजेन टेस्टद्वारे मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ४६, ग्रामीण भागात १२ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३४ हजार ८४५ झाली असून आतापर्यंत २९ हजार ९६२ रुग्ण बरे झाले आहेत. तीन हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९७७ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील बाधित
परिसर, कंसात रुग्णसंख्या : घाटी परिसर (१), समर्थनगर (१), शिल्पनगर, पदमपुरा (१), श्रेयनगर (१), नवनाथनगर (१), कासलीवाल तारांगण, पडेगाव (१), गजानननगर (१), स्वामी विवेकानंद कॉलनी (२), एन-सहा सिडको (१), सिंहगड कॉलनी (२), शिवाजीनगर (१), गारखेडा, गजानन मंदिराजवळ (१), जयभवानीनगर (४), उल्कानगरी (१), बीड बायपास (२), जिजानगर (१), एन-अकरा, गजानननगर, हडको (१), एन-सहा सिडको (१), सिडको (१).

कोरोना रुग्णांना म. फुले योजनेतून उपचार मिळेना ! खंडपीठात शपथपत्र दाखल.

ग्रामीण भागातील बाधित
औरंगाबाद (२), फुलंब्री (३), गंगापूर (२), सिल्लोड (४), वैजापूर (२), सोयगाव (१), सिडको महानगर (२), गीतांजली सो., सिडको महानगर (१), राममंदिर परिसर, म्हाडा कॉलनी, बजाजनगर (१), सारा व्यंकटेश, बजाजनगर (१), सिडकोच्या कार्यालयाच्यामागे, बजाजनगर (२), पंढरपूर (१), चिकलठाण, कन्नड (१), भिलपैठण गल्ली, कन्नड (१), पांडवनगरी, कन्नड (२), करमाड (१), शिवाजीनगर, सिल्लोड (२), पालखेड, वैजापूर (१), अजिंठा,‍ सिल्लोड (१), दारेगाव, खुलताबाद (१), नादारपूर, कन्नड (२), गोपीवाडा, पैठण (२), लक्ष्मीनगर, पैठण (१), नाथ मंदिर, पैठण (१), तलाठी कॉलनी, वैजापूर (१), नवजीवन कॉलनी, वैजापूर (१), एचडीएफसी कॉलनी, वैजापूर (१), भिवधानोरा, गंगापूर (२), सारा सार्थक परिसर, बजाजनगर (१), खांडसरी परिसर, कन्नड (१), नेवरगाव, गंगापूर (१), स्टेट बँक ऑफ इंडिया परिसर, सिल्लोड (१), लाडगाव (१), लिंबेजळगाव (१).

 

Edited : Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 120 Cases Recorded In Aurangabad