Corona Update : औरंगाबादेत १८३ रुग्ण कोरोनाबाधित, जिल्ह्यात २८ हजार ६७८ रुग्ण झाले बरे

मनोज साखरे
Sunday, 4 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी  (ता. तीन) १८३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी  (ता. तीन) १८३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४ हजार १९३ झाली. आजपर्यंत एकूण ९५३ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४ हजार ५६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ८८ व ग्रामीण भागात २० रुग्ण आढळले आहेत. आज ४३५ जणांना सुटी झाली. यात शहरातील २५० व ग्रामीण भागातील १८५ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत २८ हजार ६७८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटनेवर भाजपच्या महिला खासदार गप्पा का?,...

ग्रामीण भागातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : पानवडोद सिल्लोड (१), वाळूज (१), भालगाव, फुलंब्री (१), मुलानी वडगाव (१), रामनगर, पैठण (१), समृद्धी महामार्ग, नायगाव (१), चित्तेगाव (१), खामगाव, वैजापूर (२), जयभवानीनगर, बजाजनगर (३), नवीन कावसान, पैठण (१), अन्नपूर्णानगर, पैठण (२), नरसापूर, गंगापूर (१), गंगापूर डीसीएचसी (१), लासूर, गंगापूर (१), समतानगर, गंगापूर (१), नेवरगाव, गंगापूर (१), अंबेलोहळ, गंगापूर (१), लोणी बु. वैजापूर (१), फुलेवाडी, वैजापूर (१), स्वामी समर्थनगर, वैजापूर (१), स्टेशन रोड, वैजापूर (२), पिंपळखेड, कन्नड (१), औरंगाबाद (२), फुलंब्री (४), गंगापूर (३), सिल्लोड (२), कन्नड (४), वैजापूर (२), पैठण (४)

शहरातील बाधित : ग्लोरिया सिटी, भावसिंगपुरा (२), घाटी परिसर (१), राधास्वामी कॉलनी (१), गजानननगर, हडको (१), न्यू विशालनगर (३), इंदिरानगर (१), एन-दोन सिडको (१), कांचनवाडी (१), भारतनगर (१), छावणी परिसर (१), काल्डा कॉर्नर, श्रेयसनगर (१), टाऊन सेंटर, सिडको (३), गजानन कॉलनी (१), जालननगर (२), वानखेडेनगर (१), होनाजीनगर (१), राजीव गांधीनगर (१), जयभवानीनगर (१), विश्वभारती कॉलनी (१), शिवाजीनगर (२), उल्कानगरी (१), एन-पाच गुलमोहर कॉलनी (१), एन -सात (२), आनंदनगर (१), न्यू हनुमाननगर (१), टिळकनगर (१), साईनगरी (१), ज्योतीनगर (१), एन-आठ सिडको (१), धूत हॉस्पिटल परिसर (१), राजेसंभाजी कॉलनी (१), ठाकरेनगर (२), चिकलठाणा (१), बीड बायपास (१), पीडब्ल्यूडी कॉलनी (१), नंदनवन कॉलनी (१), राजाबाजार (१), सिडको (१),

चिमुकल्यांना लागलाय गोष्टी ऐकण्याचा छंद; ‘मिस कॉल द्या, गोष्ट ऐका’ उपक्रमाला...  

कोरोना मीटर
----------
बरे झालेले रुग्ण : २८६७८
उपचार घेणारे रुग्ण : ४५६२
एकूण मृत्यू : ९५३
-------------------------------
आतापर्यंतचे बाधित : ३४१९३
-------------------------------

औरंगाबादेत सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
औरंगाबादेत सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९५३ जणांचा मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. घाटी रुग्णालयात शहरातील ६० वर्षीय पुरुषांचा दोन ऑक्टोबरला दुपारी मृत्यू झाला. याच दिवशी पीरबावडा (ता. फुलंब्री) येथील ६० वर्षीय पुरुषाचा रात्री अकराच्या सुमारास, बहीरगाव (ता. कन्नड) येथील ६० वर्षीय पुरुषाचा मध्यरात्री बाराच्या सुमारास मृत्यू झाला. सावित्रीनगर, चिकलठाणा येथील ८० वर्षीय पुरुषाचा आज (ता. तीन) सकाळी नऊच्या सुमारास मृत्यू झाला. शिवकृपा कॉलनी येथील ६५ वर्षीय महिलेचा दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला; तसेच लोणी काळे (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील ५५ वर्षीय पुरुषाचा आज पहाटे चारच्या सुमारास मृत्यू झाला.

Edited : Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 183 Cases Recorded In Aurangabad