esakal | दौलताबाद किल्ल्यावर गर्दीच गर्दी! किल्ल्यावरील पर्यटकांना खालीच येता येईना...
sakal

बोलून बातमी शोधा

daulatabad fort.jpg

पण सुरू केलेल्या काही पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रशासनाची तयारी कमी पडताना दिसत आहे

दौलताबाद किल्ल्यावर गर्दीच गर्दी! किल्ल्यावरील पर्यटकांना खालीच येता येईना...

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: कोरोनाकाळात देशातील सर्व पर्यटनस्थळे बंद होती. ज्यावेळेस देशात अनलॉक सुरू झालं तसतसं प्रशासनाने अनेक किल्ले, मंदिरे तसेच प्रसिद्ध पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सुरू केली होती. त्यावेळेस प्रशसानाने कोरोना संबंधीची सर्व काळजी घेण्याचे आवाहन पर्यटकांना केलं होतं.

पण सुरू केलेल्या काही पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रशासनाची तयारी कमी पडताना दिसत आहे. काही ठिकाणी नियोजना अभावी गर्दी होताना दिसत आहे. फिरताना बरेच जण कोरोनाबद्दल प्रशासनाकडून ज्या सूचना दिल्या आहेत त्या पाळताना दिसत नाहीत. 

Gram Panchayat Election: सरपंचपदासाठीचे SC आणि ST चे आरक्षण कायम

आज सुट्टी असल्याने बऱ्याच पर्यटकांनी दौलताबाद किल्ल्यावर गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामध्ये प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला. कारण किल्ल्यावरील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. सुदैवाने यामध्ये काही दुर्घटना घडली नाही. 

झालं असं की, सुट्टीमुळे बऱ्याच पर्यटकांनी आज थेट दौलताबाद किल्ला गाठला पण जे किल्ल्यावर गेले त्यांना वाढलेल्या गर्दीमुळे खाली येणं शक्य होईना. तसेच नवीन येणाऱ्या पर्यटकानाही वर जाता येईना. एन्ट्री पॉईंटला व्यवस्थित नियोजन नसल्याने आज हा मोठा प्रसंग ओढवला होता.

(edited by- pramod sarawale)