फडणवीस यांनी बुट हातात का घेतले ? काय आहे कारण 

शेखलाल शेख
Monday, 27 January 2020

मंचावर येतात त्यांनी आपले बुट बाजूला असलेल्या उशी जवळ ठेवले तर कार्यक्रमातून जातांना त्यांनी हातात बुट घेऊन मंचाच्या खाली जाऊन ते घातले. फडणवीस यांना बुट चोरी जाण्याची तर भिती नव्हती ना अशी चर्चा यावेळी चांगलीच रंगली.

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे सोमवार (ता.27) उपोषण सुरु आहे. या दरम्यान माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. ते काही वेळ उपोषण स्थळी सुद्धा बसले मात्र मंचावर येतात त्यांनी आपले बुट बाजुला असलेल्या उशी जवळ ठेवले तर कार्यक्रमातून जातांना त्यांनी स्वतः हातात बुट घेतले त्यानंतर ते मंचाच्या खाली गेले  तेथे त्यांनी बुट घातले. फडणवीस यांना बुट चोरी जाण्याची तर भिती नव्हती ना अशी चर्चा यावेळी रंगली. विशेष म्हणते इतर नेत्यांनी बुट मंचाच्या खाली ठेवले होते.

हेही वाचा : आम्ही केलेल्या कामाला वेग द्यावा, म्हणून उपोषण - पंकजा मुंडे

 पंकजा मुंडे यांनी सोमवार (ता.27) मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह नेत्यांची उपस्थिती होती. फडणवीस मंचावर आले त्यांनी आपल्या बाजूला असलेल्या उशीजवळच बुट ठेवले. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर हातात बुट घेऊन मंचाच्या खाली गेले तेथे त्यांनी बुट घातला. त्यांच्या हातात बुट असतांना उपस्थितीत त्यांच्याकडे बघतच राहिले. 

काय म्हणाले यावेळी फडणवीस 

आपण मराठवाडा दुष्काळ मुक्तीसाठी केलेले प्रयत्न पुढे गेले पाहिजे, मराठवाडा दुष्काळ मुक्त झाला पाहिजे यासाठी हे लाक्षणिक उपोषण आहे. भाजप सरकारच्या काळात आम्ही सुरू केलेल्या योजना आताच्या सरकारने पुढे नेल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करू, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ सिंचन नसल्याने होत आहे. मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ आहे. आपल्या आधी 15 वर्ष आघाडी सरकार होत त्यावेळी मराठवाड्यावर अन्याय झाला. गोपीनाथ मुंडे उपोषणाला बसले होते.

क्लिक करा : सुभाष देसाई म्हणाले, आता शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू

जलपरिषदच्या बैठक झाल्या नव्हत्या त्या आम्ही घेतल्या. मराठवाड्याच वाहून जाणार पाणी मिळालं पाहिजे काम अंतिम टप्प्यात आहे. कोकणाच समुद्रात वाहून जाणार पाणी गोदावरीत आणायचं आणि मराठवाड्याचा दुष्काळ दूर करायचा विचार आमचा होता. वॉटर ग्रीड मुळे अनेक जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलं. टेंडर देण्यावरून वाद आहे टेंडर कोणालाही द्या मात्र काम सुरू करा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis shoes Aurangabad news