esakal | अंगाला लागणार होती हळद, असं काय झालं की 'ती'ने घेतला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

अंगाला लागणार होती हळद, असं काय झालं की 'ती'ने घेतला गळफास

काही वर्षांपासून डॉ. सादाब शिरीन यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतले होते. त्या औरंगाबाद शहरातील आमखास मैदानासमोरील शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत होत्या.

अंगाला लागणार होती हळद, असं काय झालं की 'ती'ने घेतला गळफास

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : तेरा मार्च रोजी विवाह ठरलेल्या डॉक्टर तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. त्या औरंगाबदच्या शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत होत्या. ही घटना मंगळवारी (ता. २५) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार डॉ. सादाब शिरीन महंमद आरेफ (२८, रा. टाईम्स कॉलनी, कटकट गेट) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे.

हेही वाचा - एमआयडीसीच्या वाट्याला ही सात रस्ते...

गत काही वर्षांपासून डॉ. सादाब शिरीन यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतले होते. त्या औरंगाबाद शहरातील आमखास मैदानासमोरील शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत होत्या. काही कालावधीपूर्वी त्यांचे लग्न ठरले होते. १३ मार्च ला विवाहाची तारिख ठरल्याने कुटुंबियांनी लग्न पत्रिका छापल्या होत्या. नातेवाईकांना पत्रिका वाटपाचे काम सुरू होते.

याचदरम्यान, मंगळवारी रात्री घरातील एका खोलीत डॉ. सादाब शिरीन यांनी ओढणीने खिडकीच्या अँगलला गळफास घेतला. हा प्रकार रात्री दहाच्या सुमारास खिडकीतून डोकावल्यावर कुटुंबियांच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून शिरीन यांना खाली उतरवत घटनेची माहिती जिन्सी पोलीसांना दिली.

हेही वाचा - शिवसेना नगरसेवक का आहेत नाराज उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर

यानंतर रात्री जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गिते यांनी कर्मचा-यांसह धाव घेतली. त्यानंतर शिरीन यांना याच अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही असे जिन्सी पोलीसांनी सांगितले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

घटनास्थळी गेलो होतो. प्रथमदर्शनी आत्महत्या केल्याचे समोर आले. उत्तरीय तपासणी अहवालानंतर अधिक बाबी स्पष्ट होतील.
- व्यंकटेश केंद्रे, पोलिस निरीक्षक, जिन्सी ठाणे